ETV Bharat / state

खासगी सावकाराच्या गुंडांची शेतकऱ्यांना मारहाण; ६ शेतकऱ्यांसह एक महिला जखमी

सावकाराने अवैधरित्या ताब्यात घेतलेली शेती परत घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज मेहकर तालुक्यातील बदनापूर येथे घडली. या मारहाणीत ६ शेतकरी व १ महिला शेतकरी गंभीर जखमी झाले आहे.

buldana
जखमी शेतकऱ्यांचे दृश्य
author img

By

Published : Nov 27, 2019, 11:21 PM IST

बुलडाणा- सावकाराने अवैधरित्या ताब्यात घेतलेली शेती परत घेणाऱ्या शेतकऱ्यांना सावकाराच्या गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना आज मेहकर तालुक्यातील बदनापूर येथे घडली. या मारहाणीत ६ शेतकरी व १ महिला शेतकरी गंभीर जखमी झाले आहे. जखमी शेतकऱ्यांना उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेबाबत माहिती देताना जखमी शेतकरी व राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष गिरधर पाटील ठाकरे

सदर हल्ला अवैध सावकाराने केल्याचा आरोप शेतकरी वैजनाथ बोरकर यांनी केला आहे. बोरकर यांची जमीन अवैध सावकार वामन आनंदा आसोले यांच्या ताब्यात होती. शासनाकडे अवैध सावकारीची तक्रार नोंदविल्यानंतर शासनाने बोरकर यांच्या बाजूने निकाल देत त्यांच्या नावावर जमिनीचा सातबारा केला. त्यानंतर बोरकर यांनी आपली जमीन सावकाराच्या ताब्यातून घेत त्यात पेरणी सुरू केली. मात्र, पेरणी दरम्यान सावकाराने अचानक ३० ते २५ भाडोत्री गुंड आणून शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. गुंडांनी लोखंडी रॉड व लाठ्यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप शेतकरी वैजनाथ बोरकर यांनी केला आहे. सदर प्रकरणाबाबत त्यांनी शहर पोलिसात जबाब दिला आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेले ४ ते ५ शेतकरी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे. जखमींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे.

विशेष म्हणजे, शासनाने शेतकऱ्यांकडून निकाल दिल्यानंतर जमीन ताब्यात घेण्यासाठी वैजनाथ बोरकर हे मेहकर पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवली नसल्याचा आरोप शेतकरी बोरकर यांनी केला आहे. याप्रकरणी रात्री पर्यंत मेहकर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, या घटनेमुळे जिल्ह्यातील अवैध सावकारांकडून शेतकऱ्यांची होत असलेली पिळणूक समोर आली आहे. जिल्ह्यातील असंख्य शेतकरी सावकारी पाशात अडकले असून त्यांच्या दादागिरीला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केली आहे.

हेही वाचा- स्वस्त धान्य दुकानात गव्हासह तांदळाचा निकृष्ट दर्जा; नागरिकांमध्ये संताप

Intro:Body:बुलडाणा:- जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील बदनापुर येथील अवैध सावकाराच्या ताब्यात असलेली शेती शासनाच्या निकालानुसार आपल्या ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अवैध सावकाराने भाडोत्री गुंड आणून शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करत बेदहंम मारहाण केल्याची घटना आज बुधवारी 27 नोव्हेंबर सकाळी घडली.वैजनाथ बोरकर या शेतकऱ्यासह 5 शेतकरी व 1 महिला शेतकरी या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले आहेत.सदर हल्ला अवैध सावकारातून केल्याचा आरोप शेतकरी बोरकर यांनी केलाय.प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी रुग्णालयातील जखमी शेतकऱ्यांचे जबाब नोंदविल्याने अवैध सावकाराचा शेतकऱ्यांवर हल्ला चढविल्याचा प्रकार उघडकिस आला आहे.विशेष म्हणजे शासनाने शेतकऱ्यांकडून निकाल दिल्यानंतर जमीन ताब्यात घेण्यासाठी मेहकर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेलेले शेतकरी बोरकर यांची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप देखील शेतकरी बोरकर यांनी केलाय. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदर अवैध सावकाराचे नाव वामन आनंदा आसोले असे आहे.

मेहकर तालुक्यातील बदनापुर येथील वैजनाथ बोरकर या शेतकऱ्याची जमीन अवैध सावकार वामन आनंदा आसोले यांच्या ताब्यात होती.शासनाकडे अवैध सावकारीची तक्रार नोंदविल्यानंतर शेतकरी बोरकर यांच्या बाजूनं निकाल देत शासनाने बोरकर यांच्या नावावर जमिनीचा सातबारा केला आहे. सदर जमीन सावकाराच्या ताब्यात असल्यामुळे ती आपल्या ताब्यात घेत शेतात पेरणी करीत असतांना सावकाराने अचानक 30 ते 35 भाडोत्री गुंड आणून शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला करत लोखंडी रॉड व लाठया काठयानी बेदहंम मारहाण केल्याचा आरोप शेतकरी वैजनाथ बोरकर यांनी करीत बुलडाणा शहर पोलिसाला जबाब दिलेय या हल्ल्यात गंभीर जखमी असलेले 4 ते 5 शेतकरी सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे जख़्मीमध्ये 1 महिलांचा समावेश आहे.विशेष म्हणजे शासनाने शेतकऱ्यांकडून निकाल दिल्यानंतर जमीन ताब्यात घेण्यासाठी मेहकर पोलिसात तक्रार देण्यासाठी गेलेले शेतकरी बोरकर यांची तक्रार पोलिसांनी घेतली नसल्याचा आरोप देखील शेतकरी बोरकर यांनी केलाय.प्रकरणी रात्री पर्यन्त मेहकर पोलिसात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती..समोर आलेल्या या प्रकारामुळे बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना अवैध सावकऱ्यांचे किती त्रास आहे हे समोर आलेय आहे. तर अश्या प्रकारे जिल्ह्यातील असंख्य शेतकरी सावकारी पाशात अडकले असून त्यांच्या दादागिरी ला कंटाळून काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या आहेत

बाईट:-1) गिरधर पाटील ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी

2) वैजनाथ बोरकर,शेतकरी

-वसीम शेख,बुलडाणा-

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.