ETV Bharat / state

संतापजनक! 'कोरोना'च्या भीतीने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना घरमालकांकडून घर खाली करण्यासाठी तगादा

author img

By

Published : Mar 25, 2020, 3:25 PM IST

बुलडाण्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, आता समोर आलेल्या 'या' घटनेमुळे माणुसकी हरवल्याचे दिसत आहे.

बुलडाणा
रुग्णावर उपचार

बुलडाणा - देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा विळखा राज्यालाही बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर 21 दिवसांसाठी देश ला‌ॅकडाऊन करण्यात आला आहे. सध्या डा‌ॅक्टर, पोलीस यंत्रणा महत्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने घर मालकांनी त्यांच्या येथे भाड्याने राहणाऱ्या डाॅक्टरांना घर रिकामे करा, असे सांगितले असल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यातील खामगाव येथे घडला आहे.

कोरोनाच्या भीतीने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना घर खाली करण्यासाठी घरमालकांच्या सुचना... बुलडाण्यातील धक्कादायक प्रकार

हेही वाचा... जान है तो जहान है... आज मध्यरात्रीपासून २१ दिवस देश लॉकडाऊन - पंतप्रधान मोदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेत डॉक्टरांचा समावेश होतो. त्यामुळे आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहोरात्र जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करत आहेत. मात्र, असे असताना कदाचित डॉक्टरांमुळे किंवा रुग्णालयात सेवा बजावणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमुळे आम्हाला देखील कोरोना होईल, या धास्तीने डाॅक्टरांना किंवा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना ते राहत असलेले भाड्याचे घर रिकामे करण्यास सांगितले जात आहे.

एकीकडे देशातील कायम सेवेत असणाऱ्या डॉक्टर, पोलीस, पत्रकार या सर्वांचे आभार मानले जात आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्यात भीतीपोटी डॉक्टरांना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना भाड्याचे घर रिकामे करा असे सांगितले जात आहे. खामगाव शहरातील सिल्व्हर सिटी सर्वोपचार रुग्णालयात काम करणाऱ्या डाॅक्टरांसोबत हा प्रकार घडला आहे.

हेही वाचा... आशादायक: पुण्यातील पहिले दोन रुग्ण कोरोना मुक्त, रुग्णालयातून मिळाला 'डिस्चार्ज'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.