ETV Bharat / state

पालकमंत्री मदन येरावारांनी घेतली हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची भेट - मदन येरावर

झालेली घटना ही दुर्दैवीच आहे. मात्र, तरीही या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागणार आहे. हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

पालकमंत्री मदन येरावार
author img

By

Published : May 11, 2019, 8:28 AM IST

Updated : May 11, 2019, 11:19 AM IST

बुलडाणा - गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात वीरमरण आलेल्या जिल्ह्यातील २ जवानांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री मदन येरावर यांनी शुक्रवारी भेट घेतली. मेहकर येथील हुतात्मा राजू गायकवाड आणि आळंद येथील हुतात्मा सर्जेराव खार्डे यांच्या कुटुंबीयांचे पालकमंत्र्यांनी सांत्वन केले.

हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांची भेट घेताना पालकमंत्री मदन येरावार

पालकमंत्री येरावार यांनी सुरुवातीला मेहकर येथे हुतात्मा राजू गायकवाड यांच्या घरी भेट दिली. यावेळी पालकमंत्री यांनी वीरपिता नारायण गायकवाड , वीरमाता आसराबाई गायकवाड, वीरपत्नी भारती गायकवाड यांची विचारपूस केली आणि त्यांचे सांत्वन केले. झालेली घटना ही दुर्दैवीच आहे. मात्र, तरीही या परिस्थितीला धैर्याने सामोरे जावे लागणार आहे. हुतात्मा झालेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

आळंद येथील हुतात्मा पोलीस जवान सर्जेराव ऊर्फ संदीप खार्डे यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी पालकमंत्री यांनी वीरमाता, वीरपिता आणि वीरपत्नी यांच्याशी चर्चा केली. तसेच कुटुंबीयांना धीर दिला. यावेळी आमदार डॉ. संजय रायमूलकर, माजी आमदार तोताराम कायंदे, धृपदराव सावळे, डॉ. शशिकांत खेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमानंद नलावडे, आदी उपस्थित होते.

Intro:Body:बुलडाणा : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसूरुंग स्फोटात जिल्ह्यातील दोन पोलीस जवानांना वीरमरण आले होते. त्यामध्ये मेहकर येथील राजू गायकवाड व आळंद ता. दे.राजा येथील सर्जेराव खार्डे यांचा समावेश होता. या शहीद पोलीस जवानांच्या कुटूंबीयांची आज 10 मे रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांत्वनपर भेट घेतली.

   सुरूवातीला मेहकर येथे शहीद राजू गायकवाड यांच्या घरी भेट देत पालकमंत्री यांनी त्यांच्या कुटूंबीयांचे सांत्वन केले.  यावेळी पालकमंत्री यांनी वीर पिता नारायण गायकवाड , वीरमाता आसराबाई गायकवाड, वीरपत्नी भारती गायकवाड यांची विचारपूस करीता त्यांचे  सांत्वन केले. कुटुंबियांशी संवाद साधताना ते म्हणाले की, झालेली घटना ही दुर्दैवीच आहे. मात्र तरीही या परिस्थितीला धीराने सामोरे जावे लागणार आहे. शहीद झालेल्या कुटूंबीयांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. .त्यानंतर आळंद ता. दे.राजा येथे शहीद पोलीस जवान सर्जेराव ऊर्फ संदीप खार्डे यांच्या कुटूंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. याप्रसंगी पालकमंत्री यांनी वीरमाता, वीरपिता व वीरपत्नी यांच्याशी चर्चा केली व कुटूंबीयांना धीर दिला. मेहकर येथे पालकमंत्री यांच्या समवेत आमदार डॉ संजय रायमूलकर, माजी आमदार तोताराम कायंदे, धृपदराव सावळे, मंदाकीनी कंकाळ, विनोद वाघ आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

   तसेच शहीद पोलीस जवान सर्जेराव खार्डे यांच्या कुटूंबीयांच्या सांत्वनपर भेटीप्रसंगी आमदार डॉ शशिकांत खेडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भिमानंद नलावडे, माजी आमदार तोताराम कायंदे, धृपदराव सावळे,  दे.राजा नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे, श्याम जाधव, विनोद वाघ, डॉ गणेश मांटे आदींसह लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

बाईट:- मदन येरावार, पालकमंत्री बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:
Last Updated : May 11, 2019, 11:19 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.