ETV Bharat / state

पीक कर्जाचे वितरण 15 जुनपर्यंत पूर्ण करा, डॉ. राजेंद्र शिगणेंचे बँकांना निर्देश - dr rajendra shigane crop loans latest news

महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करण्याची सूचना करत पालकमंत्री म्हणाले, की कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करावे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र अजून यादी न आलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप करण्याचे याआधीच शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज वितरण करावे.

guardian minister dr rajendra shigane directed to bank to complete disbursement of crop loans by June 15
पीक कर्जाचे वितरण 15 जुनपर्यंत पूर्ण करा, डॉ. राजेंद्र शिगणेंचे बँकांना निर्देश
author img

By

Published : Jun 2, 2020, 6:30 PM IST

बुलडाणा - मान्सूनपूर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतांची पूर्व मशागत करून खरीप पेरणीसाठी शेती सज्ज केली आहे. बियाणे, खते, किटकनाशके आदी कृषी निविष्ठा खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी त्यांना तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून दिली पाहिजे. जिल्ह्यात बँकांनी पात्र शेतकऱ्यांना येत्या 15 जुन पर्यंत पीक कर्ज वितरण पुर्ण करावे, असे निर्देश राज्याचे अन्न व औषध प्रशासन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमार्फत वाटण्यात येणाऱ्या पीक कर्ज वितरण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री संजय गायकवाड, राजेश एकडे, आमदार श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन आदींची उपस्थिती होती.

महात्मा जोतिराव फुले कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करण्याची सूचना करत पालकमंत्री म्हणाले, की कर्जमाफी योजनेत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने पीक कर्ज वितरण करावे. कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या मात्र अजून यादी न आलेल्या शेतकऱ्यांनाही कर्ज वाटप करण्याचे याआधीच शासनाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना बँकांनी पीक कर्ज वितरण करावे. पीक कर्ज वितरण करताना कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टसिंग, मास्क किंवा रूमाल तोंडावर असणे, सॅनिटायझरचा वापर आदी बाबी कटाक्षाने पाळाव्यात. ग्राम, तालुका स्तरीय समित्यांनी शेतकरी कर्ज घेणे, पीक कर्ज कागदपत्रे आदीबाबत कार्यवाही करावी. शेतकऱ्यांना सहज होईल अशी कार्यपद्धतीचा अवलंब करावा.

यावेळी जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी पीक कर्ज वाटपाबाबतची माहिती दिली. बँक निहाय पीक कर्ज वितरणाचा आढावा याप्रंसगी घेण्यात आला. जिल्ह्यात 30 मे पर्यंत राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांमध्ये जवळपास 3 लाख 62 हजार 825 शेतकऱ्यांपैकी 22 हजार 610 खातेदार शेतकऱ्यांना 173.03 कोटी रूपयांचे पीक कर्ज वितरण करण्यात आले. बैठकीला जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उत्तम मनवर, जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण आदींसह राष्ट्रीयकृत, व्यापारी बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.