ETV Bharat / state

नकली सोन्याची नाणी विकून फसवणूक करणाऱ्या टोळीला पुन्हा केले जेरबंद

यापूर्वी देखील अंत्रज व हिवरखेड पसरीसरात दोन वेळा कोंबिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी नकली सोन्याची नाणी, देशी कट्टे व इतर हत्यारे असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींना अटक केली होती.

author img

By

Published : Jun 1, 2021, 9:16 PM IST

Updated : Jun 1, 2021, 9:36 PM IST

बुलडाणा - सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून ही नाणी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना लूटमार करत त्यांच्याकडून पैसे लुटणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याने पुन्हा एका टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत पाच जणांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हत्यारांसह 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये महेश बाळू मोहिते (वय 23), दिलीप शेषराव चव्हाण (वय 23), कृष्णा पुंडलिक चव्हाण (वय 60), बळीराम पुंडलिक चव्हाण (वय 45, रा. दधम) आणि सतिश पवन पवार (वय 19) आणि दुर्जन किसन शिंदे (रा. जयरामगड) यांचा समावेश आहे.

नकली सोन्याची नाणी विकून फसवणूक करणाऱ्या टोळीला पुन्हा केले जेरबंद
64 अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह केले कोंबिंग ऑपरेशनखामगाव तालुक्यातील जयरामगड, दधम या गावात सोन्याची नकली नाणी जवळ बाळगून संबंधीत आरोपींनी सोन्याची खरी नाणी कमी पैशात विकण्याचे अमिष दाखवून एकाला लुटल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती. हिंगोली जिल्ह्यातील हनुमान गिरी यांच्या मित्राला शिरला नेमाने येथे बोलावून या टोळीने त्याच्याजवळील 25 हजार रुपये लुटून नेले होते. या माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज राजपूत यांच्या नेतृत्वात 64 अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या फौजफाट्यासह जयरामगड व दधम या गावात 31 मे रोजी कोंबिग ऑपरेशन राबवून पाच आरोपींना अटक केली व त्यांच्याकडून मोटारसायकलसह तलवार चाकू, लाकडी काठ्या असा 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

यापूर्वीही दोन कोंबिंग ऑपरेशन करून आरोपी केली होती अटक-

Last Updated : Jun 1, 2021, 9:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.