ETV Bharat / state

Ganesh Festival 2023: मिरवणूक थांबवून 'या' गणेश मंडळाने दिला दोन तास रस्त्यातच ठिय्या... - लेवा नवयुग गणेश मंडळ

Ganesh Festival 2023: गणेश चतुर्थीचा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. परंतु मलकापूर येथील चाळीसबिघा परिसरातील 'लेवा नवयुग गणेश मंडळ' (Leva Navayug Ganesha Mandal) च्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं.

Buldhana Ganesh Festiva
लेवा नवयुग गणेश मंडळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 12:46 PM IST

Updated : Sep 20, 2023, 1:13 PM IST

बुलढाणा Ganesh Festival 2023 : राज्यात गणेशोत्सव (Ganesh Festival 2023) मोठ्या भक्तीमय वातावरणात सुरू झाला. भक्त लाडक्या बाप्पाची वर्षभर आतुरतेने वाट पाहात (Buldhana Ganesh Festival) असतात. राज्यात गणपती बाप्पाचे आगमन उत्साहात होत असताना बुलडाण्यातील मलकापूर येथे गणपती मंडळ आणि पोलीस प्रशासनामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता. पण त्यानंतर तणाव सुरळीत होत गणपतीची स्थापना करण्यात आली. गणेश मंडळ परतीच्या वाटेवर निघालेले असताना अचानक पोलीस दाखल झाले. त्यांनी मिरवणूक थांबवल्यानं मंडळाचे पदाधिकारी व पोलिसात वाद झाला. ही घटना मलकापुरातील चाळीसबिघा परिसरात (Chalis Bigha Malkapu) घडली आहे.

पोलिसांनी मिरवणूक थांबवली : मलकापूर येथील चाळीसबिघा परिसरातील 'लेवा नवयुग गणेश मंडळ' (Leva Navayug Ganesha Mandal) गणपतीची मिरवणूक मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास संपवून परतीच्या वाटेवर निघाली होती. रात्री साडेनऊच्या सुमारास चाळीसबिघा परिसरात एका रुग्णालयानजीक अचानक पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी मिरवणूक थांबवली. त्यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. (Buldhana News)

गणेश भक्तांने रस्त्यावर केले आंदोलन : सदर मिरवणुकीला का थांबवले व काय गुन्हा केला? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात आली. (Leva Navayug Ganesha Protested In Malkapur) गणपतीची प्रतिष्ठापना करू अशी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यावरही पोलिसांनी त्यांना थांबवले. त्यामुळे गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा राग अनावर झाला होता. त्यांनी रात्री गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत हे आंदोलन सुरू केलं.

राज्यात गणेश भक्तांचा उत्साह : गणेशोत्सव (Ganeshotsav 2023) साजरा करताना मंगळवारी भक्तांचा उत्साह शिगेला पोहचला होता. सर्वच आजी-माजी मंत्री आणि नेते यांच्या निवासस्थानी विघ्नहर्ता गणरायाचं मोठ्या उत्साहात, जल्लोषापूर्ण व भक्तिमय वातावरणात आगमन झालं. तर लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सकाळपासूनच नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती.

हेही वाचा -

  1. Ganesh Festival: ॐ नमस्ते गणपतये...; 'दगडूशेठ' बाप्पांसमोर ३१ हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण; विदेशी भक्तही झाले तल्लिन
  2. Ganesh Festival 2023: महाराष्ट्र सदनात गणरायाची आरती; 'बाप्पा महाराष्ट्रातील जनतेला सुखी ठेव'- भगतसिंह कोश्यारी
  3. Ganeshostav 2023 : मुंबईच्या राजापुढं 'शिवराज्याभिषेक सोहळा'; कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावरुन आणलीय माती... पहा व्हिडिओ

Last Updated : Sep 20, 2023, 1:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.