ETV Bharat / state

Gajanan Maharajs palkhi :गजानन महाराज यांच्या पालखीचे आज संतनगरीतून पंढरपूरकडे वाजत-गाजत प्रस्थान - पंढरपूर वारी

आज सकाळी श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी मंदिरात हजारो भाविक गर्दी केली होती. आषाढी वारीसाठी आज २६ मे रोजी संतनगरीतून ही पालखी पायदळ पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे.

श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
श्रींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
author img

By

Published : May 26, 2023, 3:03 PM IST

बुलढाणा : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा आज आहे. आषाढी वारीसाठी आज २६ मे रोजी संतनगरीतून ही पालखी पायदळ पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. यंदा वारीचे ५४ वे वर्ष आहे. प्रथा-परंपरेनुसार ज्येष्ठ शुध्द सप्तमीच्या दिवशी सकाळी बँड पथक, ढोल नगारे, तुतारी, टाळ मृदंगाचे निनादात वाजत-गाजत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने आज सकाळी प्रस्थान झाले.

हजारो भाविकांची गर्दी : आज सकाळी श्रींच्या पालखीला निरोप देण्यासाठी मंदिरात हजारो भाविक गर्दी केली होती. सर्वप्रथम भक्तीमय वातावरणात श्रींच्या रजत मुखवट्याची पुजा करण्यात येते. त्यानंतर पालखीचे ज्ञानोबा माऊली तुकाराम, गण गण गणात बोतेच्या गजरात भगव्या पताकाधारी वारकऱ्यांसह एका गणवेशात,शिस्तीत टाळ मृदंगाचे निनादात पाऊली करत संस्थानमधून प्रस्थान केले. श्री संत गजानन महाराजांची पालखी 27 जून रोजी श्री शेत्र पंढरपूर पोहोचणार आहे. गजानन महाराजांची दिंडी ही पाच जिल्ह्यातून आपला प्रवास करणार आहे. हा प्रवास साधरण 750 किलोमीटरचा असेल. पंढरपूरला श्री गजानन महाराज संस्थानच्या शाखेत पालखीचा पाच दिवस म्हणजेच 27 जून ते दोन जुलैपर्यंत मुक्काम राहणार आहे. तीन जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे. जुलै 23 रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर 24 जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे.

600ते 700 पताकाधारी वारकरी आहेत दिंडीत : ही दिंडी पाच जिल्ह्यातून जाणार असून तब्बल 750 किलोमीटरचे अंतर 600ते 700 पताकाधारी वारकरी गण गण गणात बोतेचा नाम गजर करत आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहचणार आहे. वारकऱ्यांचे पांढरे शुभ्र कपडे, अत्यंत शिस्तीत चालणारी पावलं अशी या दिंडीची ओळख आहे. हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक संत नगरीत दाखल होत असतात. ही दिंडी तीस दिवस पायी चालत-चालत विठू माऊलीच्या दरबारी पोहचणार आहे. ही दिंडी शिस्तीने मार्गक्रम करत पंढरपूरला जाणार आहे. दरम्यान पंढरपूर मंदिर समितीने आषाढी निमित्त काही निर्णय घेतले आहेत. २९ जूनला आषाढी पालखी सोहळा होणार आहे. या आषाढी यात्रेच्यावेळी भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मोबाईल घेवून‌ जाता येणार आहे. पण मोबाईल वापरता येणार नाही.

हेही वाचा -

  1. Panchang : सूर्योदय आणि सूर्योस्ताची वेळ, शुभ मुहूर्त, राहुकाल तिथी, जाणून घ्या आजचे पंचांग
  2. sun enterns in rohini nakshtra : आज सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे; जाणून घ्या नवतपाशी संबंधित समजुती

गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.