ETV Bharat / state

पेंशन मिळविण्यासाठी 15 वर्षापासून स्वातंत्र्य सैनिकाच्या दिव्यांग वारसांचा संघर्ष - बुलडाणा लाईव्ह

बुलडाणा जिल्ह्यातील येथील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत त्र्यंबक सोनाजी राऊत यांची दिव्यांग मुलगी पुष्पा राऊत व मुलगा पुरुषोत्तम त्र्यंबक राऊत यांचा स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती योजनेतून पेंशन मिळविण्यासाठी 15 वर्षांपासून केंद्रसरकार व राज्यसरकार यांच्या सोबत संघर्ष सुरू आहे.

freedom fighters heirs struggle for 15 years to get pension in buldana
बुलडाण्यातील स्वातंत्र्य सैनिकच्या दिव्यांग वारसांचा संघर्ष
author img

By

Published : Jul 15, 2021, 8:57 AM IST

बुलडाणा - देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोठा वाटा असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या दिव्यांग वारसाला तब्बल 15 वर्षांपासून स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती योजनेतून पेंशन मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. पेन्शन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

बुलडाण्यातील स्वातंत्र्य सैनिकच्या दिव्यांग वारसांचा संघर्ष

दिव्यांग नातेवाईकावर उपासमारीची वेळ -

बुलडाणा जिल्ह्यातील आसलगाव येथील स्वातंत्र्य सैनिक दिवंगत त्र्यंबक सोनाजी राऊत यांची दिव्यांग मुलगी पुष्पा राऊत व मुलगा पुरुषोत्तम राऊत यांचा स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती योजनेतून पेंशन मिळविण्यासाठी 15 वर्षांपासून केंद्र व राज्यसरकारसोबत संघर्ष सुरू आहे. मात्र, शासनदरबारी त्यांच्या या मागणीकडे कुणीही लक्ष देत नसल्याने पुष्पा राऊत यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, असे पुरुषोत्तम राऊत यांनी सांगितले.

freedom fighters heirs struggle in buldana
सन्मानपत्र

असा सुरू आहे संघर्ष

स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती योजना, 1980 अंतर्गत स्वातंत्र्य सैनिकाच्या निधनानंतर त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या एकाच पात्र व्यक्तीस पेंशन देण्याची तरतूद आहे. मात्र, जिल्ह्यातील आसलगाव येथील दिवंगत स्वातंत्र्य सैनिक त्र्यंबक सोनाजी राऊत यांची दिव्यांग मुलगी पुष्पा राऊत यांना पेंशन न मिळाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्या दोन्ही पायाने अपंग असून कर्णबधीर देखील आहे. मागील 15 वर्षांपासून शासन दरबारी पेंशन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

केंद्र सरकारचे सन्मानपत्र

स्वतंत्र दिनापासून उपोषणाचा इशारा -

स्वातंत्र्य सैनिक सन्मान निवृत्ती योजनेत पेंशन मिळत नाही. त्यामुळे बुधवारी 14 जुलै रोजी पुष्पा राऊत व त्यांचा भाऊ पुरुषोत्तम त्र्यंबक राऊत यांनी 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहे, असे पत्र जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांना दिले आहे.

केंद्र सरकारने केला सन्मान -

स्वातंत्र्य सैनिक दिवंगत त्र्यंबक सोनाजी राऊत यांनी सन 1942 च्या इंग्रजांच्या विरोधातील लढाईत सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना कारावासाची शिक्षा देखील झाली होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर या लोकांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून केंद्र सरकारकडून सन्मानित करण्यात आले होते. त्यामध्ये दिवंगत त्र्यंबक सोनाजी राऊत यांचा देखील समावेश आहे. दिवंगत त्र्यंबक सोनाजी राऊत यांचा मृत्यू 2006 मध्ये झाला होता.

पेंशन मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सेनानींच्या दिव्यांग वारसांचा संघर्ष

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ महिन्यानंतर वाराणसी दौऱ्यावर; विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.