ETV Bharat / state

Food Poisoning To Students: शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; सहा विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक

Food Poisoning To Students : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथील शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याचं समोर आलंय. सहा विद्यार्थिनींची प्रकृती चिंताजनक आहे. बाधित मुलींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Food Poisoning To Students
विद्यार्थीनींना अन्नातून विषबाधा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 23, 2023, 8:34 PM IST

Updated : Sep 23, 2023, 10:18 PM IST

विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा

बुलढाणा Food Poisoning To Students : जिल्ह्यातील चिखली येथील मुलींच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडलीय. या मुलींना मध्यरात्री एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. चिखली येथील या शासकीय मुलींच्या वसतिगृहात गरीब कुटुंबातील 62 मुलींचा प्रवेश आहे. या वसतीगृहातील मुलींना अतिशय निकृष्टदर्जाचं अन्न दिलं जात असल्याचं समोर आलंय.

वॉर्डनवर कारवाई करण्याची मागणी : या मुलींना कोणतीही सुविधा याठिकाणी मिळत नाही. मुलींना पिण्याचं शुद्ध पाणी नाही, जेवणात नेहमीच अळ्या पडलेल्या असतात. भाजीपालाही सडलेला असतो. झोपण्यासाठी दोन मुलींना एकाच बेडवर झोपावं लागतं. गादी, चादर सुद्धा बदलून मिळत नाही. शिवाय समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितलं तर वसतिगृहाच्या वॉर्डन अस्मिता जोशी ह्या धमकी देतात. शिवाय वस्तीगृहातील प्रवेशही रद्द करण्याची धमकी देतात. त्यामुळं मुली आजपर्यंत दबावाखाली जगत असून अन्याय सहन करत आहेत, असा आरोप होतोय. या वसतीगृहासाठी राज्य सरकार समाज कल्याण विभाग लाखो रुपयांचा खर्च करतं. तरीही मुलींना अळ्या पडलेलं शिळं अन्न खायला दिलं जातंय. हा प्रकार धक्कादायक आहे. या धक्कादायक घटनेची माहिती कळताच चिखलीच्या आमदार श्वेता महाले व माजी आमदार तथा राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा रेखा खेडेकर यांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली. मुलींची विचारपूस केलीय, तसंच त्यांना धीर दिला. यावेळी या महिला नेत्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरलंय. वॉर्डनवर कारवाई करण्याची मागणी केलीय. (Food Poisoning To Students of Government Hostel)

निकृष्ट दर्जाचे अन्न : नेहमीच खिचडी प्रकरण असो की, मुलामुलींचं निवासी वस्तीगृहामध्ये अनेकवेळा निकृष्ट दर्जाचे अन्न दिलं जातं, अशा प्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्याबद्दल तक्रारी केल्यास त्या मुलांना देखील त्रास दिला जातोय. हे प्रकार जीवघेणे आहेत. जेव्हा हे प्रकरण चार भिंतीच्या बाहेर येतं, तेव्हा यावर थातूरमातूर कारवाई केली जाते. कायमस्वरूपी याला आळा घालणं व कठोर पावले उचलणं सरकारच्या वतीनं अपेक्षित आहे. (Government Hostel in Chikhali)

Last Updated : Sep 23, 2023, 10:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.