बुलडाणा - जगभरात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच आहे. बुलडाणा जिल्ह्यात 17 तर शेगावमध्ये 3 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला पुढील उपचाराच्या दृष्टिकोनातून शेगावच्या श्री. संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने विसावा भक्तनिवास संकुल येथे रुग्णांसाठी ५ वार्डात ५०० बेडचे सुसज्ज क्वारंटाईन युनिट तयार करण्यात आले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे भविष्यात शासकीय रुग्णालय कमी पडणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून करण्यात आलेल्या आवाहनाच्या दृष्टीने शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने विसावा भक्तनिवास संकुल येथील रुग्णांसाठी ५ वार्डात ५०० बेडचे सुसज्ज क्वारंटाईन युनिट तयार करण्यात आले आहे. या ठिकाणी कोव्हीड सेंटर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी कोरोना संशयितांना तथा काही प्रमाणात कोरोनाचे लक्षण असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर आरोग्य विभागाचे कर्मचारी, डॉक्टरही या ठिकाणी राहून त्यांचा उपचारही करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे भरती करण्यात आलेल्या रुग्णांना सर्व सोयी-सुविधा तसेच जेवणाचीही व्यवस्थाही श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. हेही वाचा - बुलडाणा स्त्री रुग्णालयात सोयी-सुविधांचा अभाव; क्वारंटाईन असलेल्या नगराध्यक्षांनीच केली तक्रार