ETV Bharat / state

चिखलीमध्ये इमारतीला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

चिखलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रल्हाद सहाय शर्मा यांच्या पद्मालय या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या फर्निचरच्या गाळ्याला अचानक आग लागून लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले.

BULDANA FIRE
चिखलीमध्ये इमारतीला आग लागल्याने लाखोंचे नुकसान
author img

By

Published : Feb 27, 2020, 8:08 PM IST

बुलडाणा - चिखली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ असलेल्या पद्मालय इमारतीला अचानक आग लागल्याने मोठे नुकसान झाले. गुरुवारी (27 फेब्रुवारी) सायंकाळी ही घटना घडली. चिखलीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या प्रल्हाद सहाय शर्मा यांच्या पद्मालय या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या फर्निचरच्या गाळ्याला अचानक आग लागून लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले.

चिखलीमध्ये इमारतीला आग लागल्याने लाखोंचे नुकसान

हेही वाचा - 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मधील रजनीकांत यांची दमदार झलक, पाहा प्रोमो

फ्रिज, कूलर, सोफासेट, टीपॉय व इतर लाकडी फर्निचर जळून खाक झाले. या आगीची माहिती मिळताच नगरपालिकेचे अग्नीशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दल व परिसरातील नागरिकांना शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. त्यामुळे नुकसानीचा नेमका आकडा कळू शकला नाही. तसेच आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र, ही आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा - यवतमाळमधील हॉटेलमध्ये १० वर्षीय मुलीचा विनयभंग, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.