बुलडाणा - चिखली शहरातील आठवडी बाजारात असलेल्या भंगारच्या गोडाऊनमध्ये आज दुपारी अचानक आग लागली. यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र, यात 2 लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा- Coronavirus : अहमदनगरमध्ये 60 वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, मृतांची संख्या 2
दुपारी 1 वाजताच्या सुमारास शहरातील आठवडा बाजारातील भंगाराच्या दुकानत अचानक आग लागली. काही वेळातच आग परिसरात परसली. आगीचा भडका दिसताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, नगर पालिकेच्या अग्निशमन दलालाही घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले. या आगीत बाजारातील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने मोठे नुकसान झाले आहे. नजीर कुरेशी यांचे हे भंगाराचे गोडाऊन असून यात 2 लाख लाखांचे भंगार जळाले असल्याची माहिती आहे.