ETV Bharat / state

बुलडाण्याच्या राजुर घाटाच्या जंगलाला आग; पर्यावरणप्रेमी, वनविभागान व अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण - बुलडाणा आग बातमी

बुलडाणा शहराला लागून असलेल्या राजुर घाटातील जंगलाला रविवारी 28 फेब्रुवारीच्या रात्री आग लागल्याची घटना घडली. पर्यावरण प्रेमी, वनविभाग व अग्निशामक दल यांच्या अथक प्रयत्नाने 3 तासानंतर आग विझवण्यात यश मिळाले.

बुलडाण्याच्या राजुर घाटाच्या जंगलाला आग
बुलडाण्याच्या राजुर घाटाच्या जंगलाला आग
author img

By

Published : Mar 1, 2021, 8:20 PM IST

बुलडाणा - बुलडाणा शहराला लागून असलेल्या राजुर घाटातील जंगलाला रविवारी 28 फेब्रुवारीच्या रात्री आग लागल्याची घटना घडली. याबाबत राजूर घाटातून जाणाऱ्या काही पर्यावरण मित्र, वनविभाग व अग्निशामक दल यांच्या अथक प्रयत्नाने 3 तासानंतर आग विझवण्यात यश मिळाले.

तीन तासानंतर आगीवर नियंत्रण -

बुलडाणा अजिंठापर्वत रांगेत वसलेले शहर आहे. शहराला लागून ही रांग जाते व त्याला राजुर घाट असे नाव दिलेले आहे. याच राजुर घाटातून बुलडाणा-मलकापूर मार्ग जातो. रविवारी 28 फेब्रुवारी रोजी रात्री राजूर घाटातील हनुमान मंदिर परिसरातील जंगलात आग लागली व ही आग अंधार असल्याने स्पष्ट दिसत होती. रात्री 8 वाजेच्या सुमारास आग मोठ्या क्षेत्रात पसरली. या मार्गाने जाणारे काही पर्यावरण प्रेमी थांबले व त्यांनी आपआपल्या परीने वनविभाग, अग्निशमन दल व पोलिसांना याची माहिती दिली. प्रशासकीय यंत्रणा पोहोचण्याची वाट न बघता बुलडाणा येथील पर्यावरण प्रेमींनी रात्रीच्या अंधारात या डोंगर दऱ्यात आपला जीव धोक्यात घालून आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही वेळानंतर बुलडाणा नगर परिषदेचे अग्निशमन दल, वनविभागाचे फायर फायटर व पोलीस मदतीला धावून आले. तिघांच्या मदतीने तीन तासानंतर आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.