बुलडाणा- जिल्हा प्रशासनाला रविवारी मिळालेल्या 16 अहवालांमध्ये 15 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. 5 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात शुक्रवारपासून 43 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी आलेल्या 28 अहवालात 13, शनिवारी आलेल्या 65 अहवालात 15 अहवाल पॉझिटिव्ह होते.
15 रुग्णांमध्ये शक्तीपुरा मलकापूर येथील 40 वर्षीय महिला, जोगडी फैल येथील 30 वर्षीय महिला, वरवट बकाल ता. संग्रामपूर येथील 51 वर्षीय पुरुष, आळसणा ता. शेगाव येथील 45 वर्षीय महिला, 72 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 18 वर्षीय तरुण, 33 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय पुरुष रुग्णाच्या अहवालाचा समावेश आहे. जळगाव जामोद येथील 53 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय पुरुष व 67 वर्षीय पुरूष संशयित रुग्ण, काँग्रेस नगर शेगाव येथील 19 वर्षीय तरुणी, निवाना ता. संग्रामपूर येथील 34 व 36 वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
रविवारी 5 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे कोविड रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये जोगडी फैल शेगाव येथील 58 वर्षीय महिला, नांदुरा येथील 45 वर्षीय पुरुष, पारपेट मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, पातुर्डा ता. संग्रामपुर येथील 66 वर्षीय पुरुष व 37 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
आजपर्यंत 2434 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 144 जणांना कोरोनामुक्त झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. 126 तपासणी नमुन्यांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 213 वर पोहोचली आहे.जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 58 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.