ETV Bharat / state

'गण गण गणात बोते'च्या जयघोषात शेगावात उसळला भक्तीचा जनसागर - celebration of Saint Gajanan Maharaj festival

संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने १४२ वा प्रगट साजरा केला जात आहे. या उत्सवा निमीत्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शेगावमध्ये करण्यात आले आहे.

festival-of-saint-gajanan-maharaj-has-started-in-shegaon
गण गण गणाते बोते च्या जयघोषात शेगावात उसळला भक्तीचा जनसागर
author img

By

Published : Feb 15, 2020, 12:48 PM IST

बुलडाणा - संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने ‘श्रीं’चा १४२ वा प्रगट दिनी शनिवारी 15 फेब्रुवारीला लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीभाव व उत्साही वातावरणात साजरा होत आहे. या प्रकट दिनानिमित्त ९ फेब्रुवारीपासूनच शेगावात उत्सवाला सुरुवात झाली होती. मात्र, उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातील 1,227 दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. भाविकांचीही सकाळपासूनच शेंगावात रीघ लागली आहे.

गण गण गणाते बोते च्या जयघोषात शेगावात उसळला भक्तीचा जनसागर

विदर्भाची पंढरी म्हणून ओळखली जाणारी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त संस्थानच्यावतीने ९ फेब्रुवारीपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काकड आरती, भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन असे दैनिक कार्यक्रम उत्साही वातावरणात साजरे करण्यात आले. आज सकाळी श्रींच्या प्रगट दि ना’ निमित्त कीर्तन होईल. त्यानंतर सकाळी १० वाजता यज्ञाची पूर्णाहूती होईल. दुपारी दोन वाजता श्रींच्या पालखीची रथ, मेणा, गज, अश्‍वासह नगर परिक्रमा निघेल. यानंतर १६ फेब्रुवारीला काल्याचे कीर्तन होऊन उत्सवाची समाप्ती होणार आहे. दरम्यान, मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने मंदिराकडे जाणारा रस्ता एकेरी करण्यात आला आहे. त्यात दर्शनबारी व श्री मुख दर्शनबारी, महाप्रसाद, श्रींचा पारायण मंडप, श्रींची गादी, पलंग तसेच औदुंबर दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई आणि मदिंर परिसर केळीच्या खांबांनी सजविण्यात आला आहे. भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्यावतीने सर्वतोपरी सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सेवाधारी वर्ग आपली सेवा पूर्ण करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.