बुलडाणा - देशात डॉ. प्रियंका रेड्डीचे प्रकरण थंड होत नाही त्यातच आणखी एका काळिमा फासणारी घटना जिल्ह्यात घडली. एका नराधम बापानेच स्वत:च्या १६ वर्षीय मुलीवर सतत २ महिने बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंढेरा पोलिसांनी नराधाम बापाला अटक केली आहे.
पीडित १६ वर्षीय मुलगी सोमवार २ नोव्हेंबरला तिच्या घराबाहेर पळून चिखली शहरात आली. तिला रडताना पाहून काही स्थानिक लोकांनी तिची चौकशी करून तिला तिच्या घरी नेण्यात आले. घरातून पळून जाण्याच्या कारणावरून तिच्या आत्याने तिला मारहाण केली. पळून जाण्याचे कारण विचारले असता पीडित मुलीने वडिलांकडून सतत २ महिन्यांपासून होत असलेल्या अत्याचाराबाबत सांगितले. सदर प्रकार ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसला आणि तिला तत्काळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
हेही वाचा - बुलडाण्यात जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धा संपन्न, 413 खेळाडूंनी घेतला सहभाग
पीडित मुलीच्या तक्रारीनंतर अंढेरा पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदवून आरोपी बापाला अटक केली आहे. यांनतर पीडित मुलीला वैद्यकीय उपचारासाठी बुलडाण्यात नेण्यात आले असून याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - बुलडाणा: वकाना येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या