ETV Bharat / state

बुलडाणा : कंपनीतील केमिकलयुक्त पाणी शेतात आल्याने मलाकापुरातील शेतकरी त्रस्त - बुलडाणा केमिकल पाणी बातमी

एका केमिकल कंपनीतून केमिकलयुक्त सांडपाणी बाहेर सोडल्यामुळे आजू-बाजूच्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील शेकडो हेक्टर शेतातील पिके जळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

buldana latest news
buldana latest news
author img

By

Published : Oct 3, 2021, 9:29 AM IST

बुलडाणा - मलकापूर तालुक्यातील दसरखेड एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीतून केमिकलयुक्त सांडपाणी बाहेर सोडल्यामुळे आजू-बाजूच्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील शेकडो हेक्टर शेतातील पिके जळत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

कंपनीच्या आजूबाजूच्या सर्व गावातील विहिरी, हातपंपांचे पाणीही केमिकलयुक्त झाले आहेत. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चर्मरोग, किडनी खराब होने, असे अनेक आजार जडत असल्याने गावकरी त्रस्त आहेत. हा सर्व त्रास शेतकरी तब्बत 15 वर्षांपासून सहन करत आहे. यासंदर्भात कित्येक वर्षांपासून जिल्हा प्रशासनाला तक्रारी देऊनही त्यावर ठोस उपाय न काढल्याने आम्ही आत्महत्या करण्याच्या उंबरठ्यावर आहोत, अशी प्रतिक्रिया शेकऱ्यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण -

मलकापूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या दसरखेड एमआयडीसीमधील एका केमिकल कंपनीतून निघालेल्या सांडपाण्यावर प्रकिया न करता, ते पाणी कंपनीच्या बाहेर सोडले जात आहे. यामुळे आजू-बाजूच्या 15 ते 20 किलोमीटर अंतरावरील शेतातील पिकांवर परिणाम होऊन शेतातील पिके दरवर्षी जळून जात असल्याचा आरोप परीसरातील शेतकऱ्यांनी केला आहे. गेल्या 15 वर्षांपासून याबाबतची तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. मात्र, प्रत्येक वेळी अनेक कारणाने या तस्त शेतकऱ्यांना न्याय मिळाले नाही.

पालकमंत्री डॉ. शिगणेंनी घेतली दखल -

कंपनीतून सांडपाण्याद्वारे सोडण्यात येणाऱ्या केमिकल युक्त पाण्याने शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार शेतकऱ्यांसोबत मलकापूर येथील राष्ट्रवादीचे नेते संतोष रायपुरे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे केल्यानंतर या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी एम.राममूर्ती यांच्या सोबत चर्चा करून चौकशीची करण्यासंबंधी सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी घटनास्थळी कंपनीत व शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली व प्रदूषण नियमन मंडळ विभाग अमरावती यांना तात्काळ पाण्याचे नमुने घेण्यास सांगितले. त्यानुसार कंपनीतून सोडलेल्या पाण्याचे नमुने अमरावती येथील प्रदूषण मंडळ विभागाच्या 4 अधिकाऱ्यांनी शुक्रवारी 1 ऑक्टोबर रोजी घेतले असून लवकरात-लवकर या पाण्याचा अहवाल शासनाकडे सोपविण्यात येईल, असे प्रदूषण मंडळ अधिकारी डॉ. पियुषी देशमुख यांनी सांगितले आहे.

कंपनी व शेतकऱ्यांमध्ये मध्यम मार्ग काढणार -

मलकापूर एमआयडीसीमध्ये एकच कंपनी कार्यरत आहे. त्यात हजारो कामगार मलकापूर तालुक्यातील कार्यरत आहेत. त्यामुळे कंपनी बंद होता कामा नये, केमिकल पाण्याचा निचरा कंपनीच्या एटीपी प्लान्ट द्वारे करण्यात यावा. जेणे करून केमिकल पाणी बाहेर जाता कामा नये व कंपनीचे पाणी फिल्टरेशन होणे गरजेचे आहे. त्यासाठी मी लवकर कंपनीचे मालक यांच्याशी चर्चा करणार आहे. हा त्यातील मध्यम मार्ग योग्य राहील, अशी प्रतिक्रिया मलकापूर मतदान संघाचे आमदार राजेश एकडे यांनी दिली.

हेही वाचा - खरीप पिकासह बागायती पिकांनाही नुकसान भरपाई मिळावी -देवेंद्र फडणवीस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.