ETV Bharat / state

Buldhana Farmer Protest : शेतकऱ्याचे धरणाच्या पाण्यात अर्धनग्न आंदोलन, हे आहे कारण...

Farmer half naked protest : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील गणेश काळे या शेतकऱ्याची विहीर 2017 मध्ये रोजगार हमी योजनेतून मंजूर झाली होती. त्यानुसार विहीरीचे काम करून देखील अनुदान प्राप्त झाले नाही. यामुळे अनुदान मिळण्यासाठी (get well subsidy) शेतकऱ्याने चक्क धरणातील पाण्यात अर्धनग्न आंदोलन (Farmer half naked protest ) केले आहे.

Farmer half naked protest
अर्धनग्न आंदोलन
author img

By

Published : Jan 10, 2023, 8:21 PM IST

धरणाच्या पाण्यात अर्धनग्न आंदोलन करताना शेतकरी गणेश काळे

बुलढाणा: जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील गणेश काळे या शेतकऱ्याची विहीर 2017 मध्ये रोजगार हमी योजनेतून मंजूर झाली होती. त्यानुसार गणेश काळे या शेतकऱ्याने त्या योजनेतून विहीर खोदून घेतली. मात्र त्या विहिरीवर मजूर दाखवून संपूर्ण पैसे दुसऱ्यांचे खाते जमा करण्यात आले. आणि शेतकरी गणेश काळे या लाभार्थ्याला विहिरी खोडल्याचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. यामुळे अनुदान मिळावे म्हणून शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन केले आहे. (Farmer half naked protest )

विहिरीचे अनुदान न मिळाल्याने आंदोलन : शेतकरी गणेश काळे यांनी खोदलेल्या विहिरीचे अनुदान मिळावे म्हणून त्यांनी अनेक वेळा मेहकर पंचायत समितीच्या बिडिओकडे चौकशी केली. मात्र त्यांनी याकडे पूर्णत दुर्लक्ष केल्याने शेवटी आज शेतकरी गणेश काळे या शेतकऱ्याने पेन टाकळी या धरणात उतरून अर्धनग्न आंदोलनाला (Farmer half naked protest ) सकाळ पासून सुरुवात केली. तर जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले असल्याने शेतकऱ्याचे पाण्यातच उभे राहून आंदोलन सुरूच होते.

अर्धनग्न आंदोलन : शासनाच्या रोजगार हमी योजनेत सावळ्या गोंधळाचे जिल्ह्यातील चित्र आहे. सदर योजनेतून मिळालेल्या विहिरीचे अनुदान लाभार्थ्याला मिळाले नसून हे अनुदान रोजगार सेवकांच्या खात्यावरून त्यांचा थम घेऊन काढण्यात आल्याचा आरोप करीत वैतागलेल्या मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील लाभार्थ्यांने पेनटाकळी धरणाच्या पाण्यात आज अर्ध नग्न आंदोलन सुरू केले आहे. गणेश काळे असे या आंदोलक शेतकऱ्याचे नाव आहे.

अनुदान दुसऱ्याच्या नावे जमा : जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न अधांतरी असल्याने, शेतकरी शेतात विहीर असावी यासाठी जीवाचे रान करीत आहे. शेतकरी शासनाच्या योजना चाचपडून प्रशासकीय उंबरठे झिजवतो. शासन योजना कार्यान्वित करते मात्र प्रशासन ही योजना पारदर्शक राबविते असे नाही. रोजगार हमी योजनेअंतर्गत लक्ष्मीबाई काळे या लाभार्थीला विहीर खोदण्यासाठी अनुदान दिले.परंतु यामध्येही सावळा गोंधळ दिसून येत आहे. गणेश काळे या शेतकऱ्याची लक्ष्मीबाई काळे यांच्या नावाने विहिरीसाठी 2017 रोजी विहीर मंजूर झाली होती. दरम्यान गणेश काळे यांनी रोजगार हमी योजनेतून विहीर खोदून घेतली. परंतु विहिरीवर मजूर दाखवून संपूर्ण पैसे दुसऱ्यांच्याच खात्यावर जमा करण्यात आल्याचा आरोप होत आहे. विहीर खोदण्याचे अनुदान अद्यापही त्यांना मिळाले नाही.

अन्याय झाला असल्याचा आरोप : अनुदानासाठी मेहकर पंचायत समितीच्या बीडिओकडे गणेश काळे यांनी खेटा घातल्या. परंतु त्यांनी दुर्लक्ष केल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. गणेश काळे म्हणाले की, 29 नोव्हेंबर रोजी यासंदर्भात तक्रार केली मात्र चौकशी करण्यात आली नाही. मजुरांचे आयडीएफसीचे बँक खाते आहे. रोजगार सेवकाचे थम घेऊन बँक खात्यावरून पैसे काढण्यात आले. माझ्यावर अन्याय झाला असल्यामुळे आज सकाळपासून पेनटाकळी धरणात अर्ध नग्न आंदोलनाला सुरुवात केल्याचे गणेश काळे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.