ETV Bharat / state

जिजाऊंच्या जिल्ह्यातच महिला बचत गटाच्या मेळाव्यात रंगला चक्क लावणीचा फड.. - बाजारपेठ

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांनी निर्मित केलेल्या विविध वस्तू आणि कलाकृतींना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खामगावच्या पालिका मैदानावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मेळाव्याचे आयोजन
author img

By

Published : Sep 8, 2019, 4:56 PM IST

Updated : Sep 8, 2019, 8:54 PM IST

बुलडाणा - महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी खामगाव येथे दिवगंत पांडुरंग फुंडकर यांच्या जयंती सप्ताह निमित्त 'खानथडी जत्रा' नावाने मेळावा घेण्यात आला. हा मेळावा 4 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर रोजी आयोजित केला होता. मात्र, या जत्रेत आयोजकांचीच 'जत्रा' झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यावेळी शासनाचे 55 लाख रुपये घश्यात घालून भाजपचा केल्याचा आरोप देखील काँग्रेसचे नेते दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे.

बचत गटाच्या मेळाव्यात रंगला चक्क लावणीचा फड

हेही वाचा - प्रेम प्रकरणातून हाणामारी करणाऱ्या दोन प्रियकरांना अटक, पिस्तुलासह कोयता जप्त

तर काँगेसच्या माजी नगराध्यक्षा सरस्वती खाचने यांनी देखील माँ जिजाऊंच्या जिल्ह्यात महिला बचतगटाच्या मेळाव्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली लावणीचा कार्यक्रम ठेवल्यामुळे निषेध नोंदवला. तर आयोजकांकडून नियोजन अभावचा फटका या जत्रेमध्ये आलेल्या महिला बचत गटांना बसला आहे. मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी नियोजनाच्या अभावामुळे आणि सुविधा नसल्याने काही महिला स्टॉल न लावताच निघून गेल्या. त्यामुळे या प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरवली. त्यामुळे प्रदर्शनात 85 गटांपैकी फक्त 26 स्टॉलच उरले आहेत.

महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांनी निर्मित केलेल्या विविध वस्तू आणि कलाकृतींना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खामगावच्या पालिका मैदानावर हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी मैदानावर 130 स्टॉल्स उभारण्यात आले होते. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव आयोजीत करण्यात आला होता. मात्र, या ठिकाणी महिलांसाठी कोणतेही नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे काही महिला स्टॉल न लावताच परतल्या. यावेळी बचत गटाच्या महिला चांगल्याच संतापल्या होत्या. विशेष म्हणजे महिला बचतगटाच्या मेळाव्यामध्ये रात्रीच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पुरुषाकरीता लावणीचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्यामुळे महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा - बुलडाणा शहरानजीकच्या गिरडा जंगलात आढळले शेकडो कुत्र्यांचे मृतदेह

खामगावचे माजी आमदार दिलीप सानंदा यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी बचत गट प्रदर्शनीची पाहणी केली. त्यावेळी महिलांनी आपल्या व्यथा सानंदासमोर मांडल्या. त्यामुळे महिलांनी केलेल्या तक्रारींकडे आयोजकांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी आमदार सानंदा यांनी केलाय. शिवाय शासनाकडून म्हणजेच आमदार निधीतून महिला बचत गटासाठी 55 लाख रुपये निधी मंजूर करून आयोजकांनी घशात घातल्याचा आरोप सानंदा यांनी केलाय.

तर बचत गटाच्या प्रदर्शनासाठी शासनाकडून 55 लाख रुपये निधी हा खर्चासाठी मंजूर झाला. बचत गटांना सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत, असे नगरपालिकचे उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांनी सांगितले. शिवाय या ठिकाणी फक्त सांस्कृतिक आणि मनोरंजाचेच कार्यक्रम झाले असल्याचे सांगत सावरा-सावर करण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे बचत गटांची प्रदर्शनी बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती का? प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. त्यामुळे आयोजकांवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी बचत गटांनी केली आहे.

Intro:Body:बुलडाणा -- महिलांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचवण्यासाठी  ‘बचतगट’ हा उपक्रम सरकारकडून चालवला जातोय म्हणूनच महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी खांमगाव येथ माजी कृषी मंत्री स्व पांडुरंग फुंडकर यांच्या जयंती सप्ताह निमित्त महिला बचत गटांचा खानथडी जत्रा नावाने मेळावा ४ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यन्त आयोजित केला होता.या जत्रेत आयोजकांचीच 'जत्रा' झाल्याचा हल्ला काँग्रेसने केलाय शासनाचे ५५ लक्ष रुपये आपल्या घश्यात टाकून भाजपाचा प्रचार या जत्रेत करण्यात आल्याचा आरोप देखील काँग्रेसचे नेते माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी केलाय तर कॉगेसच्या माजी नगराध्यक्षा सरस्वती खाचने यांनी देखील माँ जिजाऊंच्या जिल्ह्यात महिला बचतगटाच्या मेळाव्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पुरुषाकरिता लावणीच्या माध्यमातून घेण्यात आलेले अशोभनीय कार्यक्रमाचे महिलांतर्फे निषेध नोंदवून आयोजकांवर हल्ला चढविला आहे.तर आयोजकांकडून नियोजन अभावचा फटका या जत्रेमध्ये आलेल्या महिला बचत गटांना बसला. मेळाव्याच्या पहिल्याच दिवशी नियोजनाच्या अभावामुळे आणि सुविधा नसल्याने काही महिला स्टोल न लावताच  बचत गट निघून गेल्याचे दिसून आलेय .. त्यामुळे या प्रदर्शनाकडे नागरिकांनी पाठ फिरवलीय ..शिवाय अश्या मेळाव्याबद्दल महिला बचतगटांनी देखील नियोजनबाबत नाराजी व्यक्त केली.प्रदर्शनातील ८५ गटां पैकी फक्त २६ स्टोलच उरलेले आहे..

बुलडाणा जिल्हा नियोजन निधी आणि स्थानिक आमदार निधीतुन बचत गटांचा ४ दिवसीय मेळावा तथा प्रदर्शनी खामगावात आयोजित करण्यात आलीय .. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांनी निर्मित केलेल्या विविध वस्तू आणि कलाकृतीना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी खामगाव च्या पालिका मैदानावर हा मेळावा आयोजित करण्यात आलाय .. यासाठी या मैदानावर १३० स्टोल्स हि उभारण्यात आलेय .. महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हा महोत्सव होता ..  आयोजकांच्या नियोजनाच्या अभावामुळे कशीबशी प्रदर्शनाला सुरुवात तर झालीय , मात्र दुपारी आलेल्या पावसामुळे दुकाने गळायला लागलीय .. यावेळी काही महिलांनी आयोजकांकडे तक्रारी केल्या .. दुकानावर प्लास्टिक चे आच्छादन नसल्याने पावसामुळे दुकाने गळाली आणि दुकानातील महिलांचे सामान हि भिजले आणि नुकसान झालेय .. तर काही महिला दुकान न लावताच परतल्या , त्यांना पावसामुळे स्टोल्स लावता आले नाहीत .. त्यामुळे बचत गटाच्या महिला चांगल्याच संतापल्या होत्या. शिवाय याठिकाणी महिलांसाठी कोणतीही सुविधा उपलब्ध करून देण्यात अली नव्हती .. आणि यामुळें ग्राहकांनी याकडे पाठ फिरविलीय.विशेष म्हणजे महिला बचतगटाच्या मेळाव्यामध्ये रात्रीच्या वेळी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली पुरुषाकरिता लावणीचा कार्यक्रम लावण्यात आला होता.याला देखील उपस्थित महिला बचतगटांनी आपली नाराजी व्यक्त केलीय..

महिलांची होत असलेली हेळसांड पाहता , या महिलांनी खामगाव चे माजी आमदार दिलीप सानंदा याना हा संपूर्ण प्रकार सांगितलं असता सानंदा यांनी बचत गट प्रदर्शनी ची पाहणी केलीय .. त्यावेळी महिलांनी आपली जत्रेबद्दलची नाराजी सानंदा यांच्याकडे व्यक्त केलीय .. महिलांनी केलेल्या तक्रारींकडे आयोजकांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी आमदार सानंदा यांनी केलाय .. शिवाय शासनाकडून म्हणजेच आमदार निधीतून महिला बचत गटासाठी ५५ लाख रुपये एव्हढा मोठा निधी मंजूर करून स्थानिक नगर पालिका ला समन्वय करून हा प्रदर्शनी महोत्सव आयोजित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेय होते .. मात्र आयोजकांच्या नियोजनाचा फटका गोरगरीब महिलांना बसलाय .. या प्रदर्शनासाठी लाखोंचा खर्ची केल्या गेलाय , मात्र या जनतेच्या पैशाचा खर्च नेमका कुणाच्या खिश्यात गेला ? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे...  बचत गटांच्या नावाने ५५ लाखाचे खर्च दाखवून '' खानथडी जत्रा '' च्या नावाने बचत गटांना  कुठयलाही सुविधा न पुरविता शासनाच्या पैश्यावर आयोजकांनी डल्ला मारल्याचा आरोप माजी आमदार सानंदा यांनी केलाय .. 

यासंदर्भात नगर पालिका चे उपमुख्याधिकारी याना जाब विचारला असता त्यांनीहि  कबूल केलेय कि या बचत गटाच्या प्रदर्शनासाठी शासनाकडून ५५ लाख रुपये निधी हा खर्चासाठी आलेले आहेत .. बचत गटांना संपूर्ण सुविधाही पुरवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले .. शिवाय याठिकाणी फक्त सांस्कृतिक आणि मनोरंजाचे च कार्यक्रम झाले असल्याचा थातुरमातुर प्रयत्न त्यांनी केलाय .. माहितीप्रमाणे शासनाकडून २०० दुकानांचे ओन्लाईन टेंडर काढण्यात आले होते .. त्यापैकी फक्त याठिकाणी १३० स्टोल्स लावण्यात आलेय , मात्र नियोजन अभावि याठिकाणी या ठिकाणी प्रदर्शनातील ८५ पैकी फक्त २६ स्टोल या ठिकाणी लागलेय .. यामुळे लोकांनी या बचत गटाच्या प्रदर्शनीकडे पाठ फिरविली आणि गर्दीसुद्धा  जमली नाहीय.. त्यामुळे आल्या बचत गटाचे आर्थिक नुकसान झालेय .....
त्यामुळे आयोजकांनी फक्त हि प्रदर्शनी पैसे लाटण्यासाठी आणि भाजपाचा प्रचार करण्यासाठी केली असल्याचा आरोप हि काँग्रेस नेते तथा माजी आमदार सानंदा यानि केलाय .. 

एकप्रकारे या बचत गटांची प्रदर्शनी कासासाठी आयोजित केली होती ? , प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचे खिसे भरण्यासाठी चा तर हा प्रकार नाही ?  त्यामुळे अशा आयोजकांवर तात्काळ कारवाई होणे गरजेचे आहे ..  .. 

बाईट -- दिलीप सानंदा , काँग्रेस माजी आमदार , खामगाव .. 

बाईट - सरस्वती खाचने, माजी काँग्रेस नगराध्यक्षा नगर पालिका , खामगाव ..

बाईट -- नुरजहाबी शेख अन्वर (नम्रताताई बचत गट) 

बाईट - ताराबाई विंचनकर, बचत गट सदस्य .. 

बाईट -- मोनिका लाँभाडे , बचत गट सदस्य .. 

बाईट -- रवींद्र सूर्यवंशी , उपमुख्याधिकारी , नगर पालिका , खामगाव .. 

-वसीम शेख,बुलडाणा-

कृपया पैकेज करावे...विनंती..Conclusion:
Last Updated : Sep 8, 2019, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.