ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये दारू विक्री: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला 9 लाखांचा मुद्देमाल - illegal liquor selling

21 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात अवैध मद्याबाबत 77 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या कारवाईत 9 लाख 71 हजार 521 रुपयांचा दारूबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर 57 जणांना अटक करण्यात आली आहे.

excise-department-action-on-illegal- liquor selling-in-buldana
लॉकडाऊनमध्ये दारुविक्री: राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला 9 लाखांचा मुद्देमाल
author img

By

Published : Apr 22, 2020, 3:01 PM IST

बुलडाणा- कोरोनाचा विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे. गर्दी टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या मद्य विक्रीचे परवाने याकाळात स्थगित करण्यात आले आहेत. तसेच बारसुद्धा बंद आहेत. मात्र, जिल्ह्यात अवैधरित्या मद्य विक्री, मद्य निर्मिती होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागास मिळाली. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक आदींवर प्रशासनाकडून कडक कारवाई केली आहे. लॉकडाऊन काळात अशाप्रकारचे 77 गुन्हे दाखल करण्यात आले असून 57 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊन कालावधी लागू झाल्यापासून 21 एप्रिल पर्यंत जिल्ह्यात अवैध मद्याबाबत 77 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्यामध्ये हातभट्टी दारू 508 लिटर, मोहा सडवा रसायन 10309 लीटर, मोहाफुले 20 किलो, विदेशी मद्य 27.45 लीटर, बिअर 202.8 लीटर, देशी मद्य 105.22 लीटर, एक चारचाकी वाहन व 10 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली ओहत. अशाप्रकारे एकूण 9 लाख 71 हजार 521 रुपयांचा दारूबंदी गुन्ह्यांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

उत्पादन शुल्क विभागने ही कारवाई जिल्ह्यातील बुलडाणा शहरातील भिलवाडा, देऊळघाट शिवार, डोंगरखंडाळा शिवार, सुंदरखेड, डोंगरशेवली, अंबाशी, शिरपूर शिवार, अमडापूर, पेठ शिवार, मेहकर फाटा, खरमोळा, लाडनापूर शिवार, खिरोडा व नागापूर शिवार, किन्ही महादेव गाव व शिवार, पारखेड, शेलूडी शिवार, खामगाव, चांदई शिवार, कोलारा, शेळगाव आटोळ शिवार, सावरखेड नजीक शिवार, पळसखेड दौलत शिवार, देऊळगाव घुबे शिवार, गायखेड व हरणखेड शिवार, कुऱ्हा गोतमारा शिवार, शेलापूर, बोराखेडी शिवार, धाड-करडी शिवार, रणथम शिवार, देवधाबा शिवार या विविध भागांमध्ये कारवाई केली आहे.

जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे यांच्या सुचनेनुसार अधिक्षक बी.व्ही पटारे यांचे नेतृत्वात ही कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत निरीक्षक जी. आर गावंडे, डि. आर शेवाळे, भरारी पथकाचे एस. डी चव्हाण, ए. आर आडळकर, दुय्यम निरीक्षक र.ना गावंडे, एन. के मावळे, वा. रा बरडे आणि यांचे पथकातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे, असे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी कळविले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.