ETV Bharat / state

Accident News : आर्टिगा, बोलेरो आणि दुचाकीचा भीषण अपघात, 4 जण ठार तर तीन जण गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यातील जानेफळ देऊळगाव-साकरशा मार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. आर्टिगा, बोलेरो आणि दुचाकीचा विचित्र अपघात या ठिकाणी घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचा अक्षरशः चुराडा झाला असून 4 जण जागीच ठार झाले आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Accident News
आर्टिगा, बोलेरो आणि दुचाकीचा भीषण अपघात
author img

By

Published : May 7, 2023, 3:49 PM IST

बुलडाणा : पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन त्यांनी रस्त्याच्या कडेला केले. अपघातामुळे रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती. तर या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून आर्टिगा कार आणि बोलेरो गाडीतील नागरिक जखमी झाले आहेत. या अपघातामध्ये लक्ष्मण गवळी (27), इरफान शेख हुसेन (35), आणि सचिन नहार (34) अशी अपघातामध्ये ठार झालेल्यांची नावे आहेत. हे तिघेही दुचाकीने उसाचा रस प्यायला जात होते.

तीन जण गंभीर जखमी : जानेफळकडून देऊळगाव साकरशाकडे जाणाऱ्या भरधाव आर्टिगाने दुचाकीला जबर धडक दिली. दुचाकीवरील हे तिघेही विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकअप वाहन खामगावकडून लग्नाचे भांडे घेऊन येणाऱ्या वाहनाखाली चिरडले. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन तरुण आणि कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. तसेच कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इजाज पठाण नामक व्यक्ती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू : या अपघातात पिकअप चालक आणि कारचालक देखील गंभीर जखमी झाले आहेत. या तिघांना खामगाव येथे दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कारमधील देखील एका व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. इतर जखमींवर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे देऊळगाव साकरशा गावावर शोककळा पसरली आहे. जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कारवाई सुरू आहे. मृतांच्या शव परीक्षणानंतर त्यांचे पार्थिवावर आज देऊळगाव साकरशा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. हे तिन्ही घनिष्ठ मित्र असल्याचे समजते. अपघातात नेमकी चूक कुणाची ते पोलीस शोधत असून चूक असणाऱ्यावर नंतर गुन्हा दाखल होणार आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा : karnataka elections 2023 : पंतप्रधान भारताच्या सिलिकॉनमध्ये ८ किमीचा रोड शो सुरू, परिसर झाला भगवामय
हेही वाचा : Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊत हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नितेश राणे यांचा मोठा दावा
हेही वाचा : The Battle of the Good Wife : आमिर अलीने शेअर केली आगामी वेब सीरिजची फ्रेम; जाणून घ्या कोणती बॉलिवूड अभिनेत्री करणार पदार्पण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.