ETV Bharat / state

महिलांच्या कैफियत मांडणाऱ्या ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारा; साहित्यिक गणेश निकम केळवदकरांची मागणी - ताराबाई शिंदे बातमी

स्त्री मुक्तीसाठी महिलांच्या कैफियत मांडणाऱ्या क्रांतिकारी लेखिका ताराबाई शिंदे यांचं नाव फारसं घेतलं जात नाही. किंबहुना त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नाही.

buldana
ताराबाई शिंदे यांचे स्मारक उभारा
author img

By

Published : Mar 8, 2021, 8:10 PM IST

बुलडाणा - स्त्री मुक्तीसाठी महिलांच्या कैफियत मांडणाऱ्या क्रांतिकारी लेखिका ताराबाई शिंदे यांचं नाव फारसं घेतलं जात नाही. किंबहुना त्यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचला नाही. असं दुर्दैवाने म्हणावे लागेल. ताराबाई शिंदे यांचा इतिहास लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्यात किंवा त्यांच्या जन्मस्थानी बुलडाण्यात ताराबाई शिंदे यांचा स्मारक उभारण्यात यावा.व याकडे महिला आमदारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी साहित्यिक गणेश निकम केळवदकर यांनी आज (8 मार्च) महिला दिनानिमित्त केली आहे.

गणेश निकम केळवदकर - साहित्यिक

ताराबाई शिंदे यांचा इतिहास-

ताराबाई शिंदे यांचा जन्म १८५० साली बुलडाणा शहरात झाला. बापूजी हरी शिंदे यांची ताराबाई एकुलती एक मुलगी, बापूजी शिंदे हे महात्मा फुले यांचे समकालीन असून ते सत्यशोधक समाजाचे खंदे समर्थक आणि कट्टर कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांनी ताराबाईंना मुलाप्रमाणे वागविले. वडिलांनी बालपणीच त्यांना सत्यशोधन, कठोर चिकित्सा, न्यायप्रियता, नितीकठोरता आदी गुणांचा परिचय करुन दिला. बालपणीच हे बाळकडू मिळाल्याने ताराबाईंची वाणी आणि लेखणी निर्भय झाली. ज्याकाळी स्त्रीया शिक्षणाचा विचारही करु शकत नव्हत्या त्याकाळी ताराबाईंनी स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिला. त्यातील मांडणी व ताराबाईंनी वापरलेली अतिशय निर्भिड भाषा पाहिली म्हणजे त्यांची जडणघडण कोणत्या वातावरणात झाली हे सहज लक्षात येते.

हेही वाचा - २०२१-२२चा अर्थसंकल्प कृषी क्षेत्रासाठी समाधानकारक; कृषी तज्ज्ञ शरद निंबाळकरांचे मत

ताराबाईंना ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा कशी झाली याचा पुसटसा उल्लेख त्यांनीच प्रस्तावनेत केला आहे. त्याकाळी सुरत येथे एका महिलेवर चाललेला खटला गाजला होता. नामांकित वृत्तपत्राच्या अंकात या खटल्याची माहिती छापून आली होती. सूरत येथील ब्राम्हण कुटूंबातील विजयालक्ष्मी ही स्त्री वयाच्या १९ व्या वर्षी विधवा झाली. तत्कालीन प्रथेनुसार ब्राम्हण स्त्रीया पूनर्विवाह करत नसत. अल्पवयात पती गेला असतांनाही त्या स्त्रीला संपूर्ण जीवन जोडीदारा शिवाय काढायचे होते. वयाच्या २४ व्या वर्षी तिला अनैतिक गर्भधारणा झाली की समाजाचा प्रचंड दबाव, समाज शिस्तीच्या नावाखाली रोखलेले तीक्ष्ण डोळे त्या स्त्रीला खायला उठले.शेवटी तिने गर्भपात केला व मुल उकिरड्यात गाडले. याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. प्रकरण पोलिसांत गेले. पोलिसांनी या स्त्रीवर बालकाच्या हत्येचा आरोप लावून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने विजयालक्ष्मीचा गुन्हा पाहता तिला फाशीची शिक्षा सुनावली. परंतू या खटल्याने उपस्थित केलेल्या प्रश्नांना ताराबाईंनी वाचा फोडली.नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीने दुसरे लग्न करु नये, असा प्रश्न त्याकाळी ताराबाईंनी उपस्थित केला.

हेही वाचा अर्थसंकल्पावर कंत्राटी कर्मचारी नाखूष; महिलांची संमिश्र प्रतिक्रिया

पत्नीच्या निधनानंतर चौथ्या दिवशी सवत आणण्याची मुभा पुरुषांनाच का? असा सवाल ताराबार्इंनी विचारला. पतीच्या निधनानंतर स्त्रीने सती जावे परंतू स्त्रीच्या निधनानंतर पुरुष का म्हणून मागे राहतो? त्यानेही आपल्या प्रिय पत्नीच्या विरहाने सती का जाऊ नये? एकुणच पुरुषी व्यवस्थेची स्त्रीयांवर थोपलेली प्रथा परंपरांच्या नावावर स्त्रीयांना मिळणारी वागणूक याकडे त्यांनी डोळसपणे पाहायला सुरुवात केली. आणि त्यातून सदर ग्रंथ तयार झाला. हा ग्रंथ काही चिकित्सकपणे व परखड विचार मांडणारा ठरला की त्यातून समाजासाठी आदर्श असणारा ब्रम्हदेवही ताराबाईंनी सोडला नाही. टोकदार लेखणी, परखड मांडणी, निर्भिड विचार आणि कमालीचा स्पष्टवक्तेपणा ही ताराबाईंच्या लेखणीची वैशिष्ट्ये आहेत. अशाप्रकारे पुरुषी व्यवस्थेला स्पष्टपणे प्रश्न विचारण्याचे साहस ताराबाई शिंदेंनी केले आहे. आज स्त्रीयांसाठी आलेल्या विविध कायद्यामागे ताराबाई सारख्या खमक्या स्त्रीयांनी समस्त स्त्री वर्गाची उचलून धरलेली बाजू विधवा महिलांची मांडलेली कैफियत कारणीभूत आहे. म्हणून ताराबाई शिंदेचे कार्य कालातीत आहे आणि त्यांनी लिहिलेला स्त्री-पुरुष तुलना हा ग्रंथ स्त्रीवादी लेखणातील मैलाचा दगड आहे.मात्र त्यांनी ज्या ठिकाणी पुढाकार घेतला त्याच राज्यात एखादे स्मारक नाही ही खेदाची गोष्ट आहे असे प्रतिपादन साहित्यिक गणेश निकम केळवदकर यांनी आज जागतीक महिला दिनानिमित्त केले आहे. तसेच यावेळी महिला आमदारांनी बुलडाणा जिल्ह्यात किंवा राज्यभरात एखादे स्मारक उभाराव अशी मागणी ही त्यांनी केली आहे.

तारबाईंचे स्मारक व्हावे

१९७५ साली चीन देशातील बीजिंग येथे जेव्हा जागतिक महिला परिषद झाली त्यावेळी एका प्रवेशद्वाराला ताराबाई शिंदे यांचे नाव देण्यात आले तेव्हा मात्र ताराबाई शिंदे कोण याबद्दल शोध सुरू झाले , तो पर्यंत मात्र बहुतेक जणांना ताराबाई माहीतच नव्हत्या आणि आज देखील राज्यातील तर सोडाच पण बुलडाणा जिल्ह्यातील देखील महिलांना ताराबाई कोण होत्या, त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी कसा लढा दिला हे माहीत नाही, त्यामुळे ताराबाई शिंदे यांचे बुलडाणामध्ये स्मारक व्हावे अशी मागणी वेळोवेळी स्त्री चळवळीच्या माध्यमातून त्याचबरोबर साहित्यिकांच्या माध्यमातून प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

बुलडाणा शहरातील कारंजा चौक येथील ताराबाई शिंदे यांच्या वाड्याला महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर , खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी देखील भेटी दिल्यात आहे. आणि ताराबाई शिंदे यांचे स्मारक व्हावे यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.शिवाय ताराबाई शिंदे यांच्या वडिलांचा असलेला वाडा त्यांच्या वारसदारांनी वाटे करून विकला असून ही जागा शासनाने घ्यावी आणि त्या ठिकाणी ताराबाई चे स्मारक व्हावे अशी मागणी देखील लावून धरण्यात आली होती, मात्र अजूनही या स्मारकाच्या बाबतीत कुठेही हालचाली होतांना दिसत नाहीत,बुलडाण्यात किंवा महाराष्ट्रात ताराबाई शिंदे यांचे स्मारक झाल्यास त्यांचे विचार त्यांचे साहित्य हे समाज घटकातील स्त्री-पुरुष समानतेच्या दृष्टिकोनातून समाजापुढे येईल आणि महिलांना देखील प्रेरणा मिळेल असे साहित्यिक गणेश निकम यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडून व्यवसायिकांच्या काय आहेत अपेक्षा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.