ETV Bharat / state

बुलडाण्यातील घाटाखालच्या ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाचे उमेदवार विजयी, आजी-माजी आमदाराचा दावा

बुलडाणा जिल्ह्यातील 498 ग्रामपंचायतीचे निवडणूक निकाल सोमवारी जाहीर झाले. जिल्ह्यातील घाटाखालच्या ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाचे उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा आजी-माजी आमदारांनी केला आहे.

election-results-of-498-gram-panchayats-in-buldana-district-have-been-declared
बुलडाण्यातील घाटाखालच्या ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाचे उमेदवार विजयी, आजी-माजी आमदाराचा दावा
author img

By

Published : Jan 19, 2021, 6:45 PM IST

Updated : Jan 19, 2021, 8:14 PM IST

बुलडाणा - सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यानंतर विजयी पॅनलचे उमेदवार हे आमच्याच पक्षाचे असल्याचे दावे नेत्यांकडून करण्यात येत आहेत. बुलडाण्याच्या घटाखालील असलेल्या खरबडी, रोहिनखेड, उबाळखेड,उऱ्हा दहिगांव, तळणी ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाचे उमेदवार विजयी झाल्याचा दावा भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी व सध्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.

बुलडाण्यातील घाटाखालच्या ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाचे उमेदवार विजयी, आजी-माजी आमदाराचा दावा

सोमवारी 18 जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून बुलडाणा जिल्ह्यातील तेराही तहसील कार्यालयाच्या प्रांगणामध्ये 498 ग्रामपंचायतीच्या 3 हजार 891 सदस्य निवडीसाठी मतमोजणी झाली. निकालानंतर श्रेय घेण्याच्या वर्चस्वाच्या लढाईत पक्षाचे नेते दिवसभरात कामाला लागले होते. निवडून आलेले सर्व सदस्य हे आमच्याच पक्षाचे असल्याचा दावा भाऊ, दादा, साहेब करत आहे. बुलडाण्याच्या घटाखालील असलेल्या खरबडी, रोहिनखेड, उबाळखेड, उऱ्हा दहिगांव, तळणी या ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाची सत्ता आल्याचा भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी व सध्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दावे केला आहे.

दावा करणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये हे पॅनल आले निवडून-

खरबडी या गावांमध्ये 9 सदस्यसंख्या असून ग्राम विकास पॅनलचे 1 बिनविरोध व 6 सदस्य तर 17 सदस्यसंख्या असलेल्या रोहिनखेडमध्ये महाविकास पॅनलचे 9 सदस्य व 7 सदस्यसंख्या असलेले उबाळखेड ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास परिवर्तनचे 7 सदस्य, 11 सदस्यसंख्या असलेल्या तळणी गावांत ग्रामविकास पॅनलचे 7 सदस्य निवडून आलेले आहे.शिवाय उऱ्हा दहिगांव ही ग्रामपंचायत बीनविरोध झाली आहे. आत्ता दावा करण्यात आलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खरच कोणाची सत्ता हे सरपंच पदाच्या निवडीनंतर समोर येईल.

प्रतिक्रिया देतांना आमदार संजय गायकवाडांची जीभ घसरली-

बुलडाण्याच्या घाटाखालील असलेल्या खरबडी, रोहिनखेड, उबाळखेड, उऱ्हा दहिगांव, तळणी या ग्रामपंचायतीवर आमच्याच पक्षाची सत्ता आल्याचा माजी आमदार तथा भाजपचे नेते विजयराज शिंदे यांनी दावा केल्याच्या बाबतीत सध्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्यास त्याची प्रतिक्रिया देतांना त्याची जीभ घसरली चक्क त्यांनी विजयराज शिंदे यांना गद्दार म्हणत अश्लील शिवीगाळ केली. त्यामुळे राजकारणात अशी शिवराळ भाषा करणे शोभते का अशी चर्चा सध्या जिल्ह्यात रंगत आहेत.

Last Updated : Jan 19, 2021, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.