ETV Bharat / state

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बुलडाण्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम - बुलडाणा लेटेस्ट न्यूज

शासनाच्या निर्देशानुसार लवकरच कोविड 19 या साथरोगाची लस उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस देण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून बुलडाणा जिल्ह्यात चार ठिकाणी शुक्रवारी रंगीत तालीम करण्यात आली.

बुलडाण्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम
बुलडाण्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम
author img

By

Published : Jan 8, 2021, 9:31 PM IST

बुलडाणा- शासनाच्या निर्देशानुसार लवकरच कोविड 19 या साथरोगाची लस उपलब्ध होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये शासकीय व खासगी आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. ही लस देण्यासाठीची पूर्वतयारी म्हणून जिल्ह्यात चार ठिकाणी शुक्रवारी रंगीत तालीम करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण कक्षामध्ये राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली. यावेळी शिंगणे यांच्या हस्ते लसही देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांची उपस्थिती होती.

बुलडाण्यात कोविड लसीकरणाची रंगीत तालीम

प्राथमिक आरोग्य व ग्रामीण रुग्णालयातही झाली रंगीत तालीम

त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, डोणगांव ता. मेहकर येथे प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांच्या उपस्थितीत कोविड लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाळा ता. संग्रामपूर, ग्रामीण रुग्णालय दे. राजा येथेही कोविड लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली. कोविड लसीकरणासाठी सर्वच ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आली होती. वेटींग रूम, लसीकरण कक्ष व निरीक्षक कक्ष या त्रीस्तरीय रचनेतून लसीकरण सत्राच्या रंगीत तालमीला सुरुवात करण्यात आली. नोंदणीकृत लाभार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर लसीकरण तारीख, वेळ व ठिकाणाचा मॅसेज पाठविण्यात आला. त्यानंतर वेटींग रूममध्ये मॅसेजची पडताळणी केल्यानंतर लाभार्थ्यांची खात्री करण्यात आली. दुसऱ्या कक्षात प्रत्यक्ष लस देण्यात आली, तर तिसऱ्या कक्षात 30 मिनीटांसाठी लाभार्थ्याला निरीक्षणासाठी बसवण्यात आले. अशा पद्धतीने लसीकरण पार पडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.