ETV Bharat / state

Viral Video : पाहा... पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंनी ज्येष्ठ नागरिकाला 'का' भरला दम - शिंगणेंनी ज्येष्ठ नागरिकाला भरला दम

"तुम्ही शांत रहा, हे तुमचं राज्य नाही, हे राज्य माझं आहे, इथे सर्व कामे शांततेत झाले पाहीजे " बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी जेष्ठ नागरिकाला रागाने दम दिल्याचा व्हीडीयो सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

राजेंद्र शिंगणें
राजेंद्र शिंगणें
author img

By

Published : Jan 4, 2022, 9:31 AM IST

Updated : Jan 4, 2022, 10:34 AM IST

बुलडाणा : "तुम्ही शांत रहा, हे तुमचं राज्य नाही, हे राज्य माझं आहे, इथे सर्व कामे शांततेत झाले पाहीजे " बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingane) यांनी जेष्ठ नागरिकाला रागाने दम दिल्याचा व्हीडीयो सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हीडीयोत ते नागरिकाला शांत बसवत आहेत. तसेच सर्व अधिकारी आणि कार्यकर्तेही शिंगणेंचा हा राग पाहून शांत झाले आहेत.

व्हायरल व्हीडीयो
असा घडला प्रकार
बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे डॉ. शिंगणे यांच्या मतदार संघातील अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक 30 डिसेंबर रोजी देऊळगांवराजा येथे झाली. बैठक संपल्यावर मतदार संघातील नागरिकांनी त्यांच्या प्रलंबित कामांची डॉ. शिंगणे यांच्याकडे तक्रारी मांडल्या. असता एक जेष्ठ नागरिक त्यांचे प्रलंबित असलेले काम आणि अर्ज घेऊन शिंगणेंकडे गेला. तेव्हा शिगणेंना प्रश्न सांगताना ते नागरिकांवर भडकले आणि "तुम्ही शांत रहा, हे तुमचं राज्य नाही, हे राज्य माझं आहे, इथे सर्व कामे शांततेत झाले पाहीजे" असा दम दिला. सदर जेष्ठ नागरिकांचे नाव धंदाले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना पाहिजे होते प्रमाणपत्र
धंदाले हे जेष्ठ नागरिक असल्याकारणाने त्यांना देऊळगांवराजा तहसीलदार यांच्याकडून जेष्ठ नागरिक ओळखपत्र प्रमाणपत्र पाहिजे होते. धंदाले हे जेष्ठ नागरिकांचे प्रमाणपत्रासाठी तहसीलदार शाम धनमने यांच्याकडे गेले होते. त्यांना तहसीलदारांनी वयाचा पुरावा म्हणून डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणण्यास सांगितले.
हेही वाचा - Corona Virus Highlights In Mumbai : मुंबईत कोरोना विषाणूचा प्रसार वाढला, पालिकेची यंत्रणा सज्ज

Last Updated : Jan 4, 2022, 10:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.