बुलडाणा - डॉक्टरांमध्ये परमेश्वराचं रूप पाहिलं जातं, मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळे कधी-कधी रुग्णाला आपल्या जीवाला मुकावे लागते. म्हणून कधी-कधी डॉक्टरामध्ये यमदूतही पाहायला मिळतो. अशाच एका डॉक्टराच्या चुकीमुळे एका महिलेला आपल्या जीवाला मुकावे लागल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात घडला आहे. खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूती दरम्यान सिजरिंग शस्त्रक्रिया करताना डॉक्टरांनी महिलेच्या पोटातच बेंडेजचा बोळा विसरल्याने महिलेला पौझनिंग झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला, अशी तक्रार करून हलगर्जीपणा करून सिझरिंग शस्त्रक्रिया दरम्यान पोटात बेंडेजचा बोळा विसरणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महिलेच्या पतीने खांमगाव शहर पोलिसात केली आहे. मृत महिलेच्या पतीने या प्रकाराची तक्रार जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडेगी केली आहे. विशेष म्हणजे सिझरिंगमध्ये जन्माला आलेल्या बाळाला आपल्या आईला गमवावे लागले आहे. पूजा पाखरे असे मृत महिलेचा नाव आहे.
अक्षम्य हलगर्जीपणा.. प्रसूतीवेळी महिलेच्या पोटात डॉक्टर विसरले बँडेजचा बोळा, महिलेचा मृत्यू - डॉक्टर महिलेच्या पोटात विसरले बँडेज
डॉक्टरांमध्ये परमेश्वराचं रूप पाहिलं जातं, मात्र डॉक्टरांच्या चुकीमुळे कधी-कधी रुग्णाला आपल्या जीवाला मुकावे लागते. म्हणून कधी-कधी डॉक्टरामध्ये यमदूतही पाहायला मिळतो. अशाच एका डॉक्टराच्या चुकीमुळे एका महिलेला आपल्या जीवाला मुकावे लागल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगावात घडला आहे.