बुलडाणा - जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 27 में रोजी मलकापूर येथे 38 वर्षीय कोरोनाबाधित व्यक्ती आढळला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या मलकापूर येथील डॉक्टर दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली आहे.
तपासणीसाठी पाठविलेल्या स्वॅबच्या अहवालात शुक्रवारी रात्री डॉक्टर दाम्पत्याचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त झाले. ज्यामध्ये 39 वर्षीय महिला व 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 55 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. तर रुग्णालयात 20 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 32 कोरोनाबाधित रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान तपासणीसाठी पाठवलेल्या अहवालांपैकी 19 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1072 निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी पुरी यांनी दिली आहे.