ETV Bharat / state

मतमोजणीसाठी बुलडाणा जिल्हा प्रशासन सज्ज - counting

लोकसभा मतदारसंघात18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. या मतदानाची मोजणी 23 मे रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर रोड येथे सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे. याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी केंद्रामधील कक्ष सुसज्ज करण्यात आले आहेत.

मतमोजणीसाठी बुलडाणा जिल्हा प्रशासन सज्ज
author img

By

Published : May 22, 2019, 9:28 AM IST

बुलडाणा- लोकसभा मतदारसंघात18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. या मतदानाची मोजणी 23 मे रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर रोड येथे सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे. याकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी केंद्रामधील कक्ष सुसज्ज करण्यात आले आहेत.

मतमोजणीसाठी विधासनभा मतदारसंघनिहाय 6 विभाग करण्यात आले आहेत. या मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार आहेत. सर्वप्रथम पोस्टल व इटीबीपीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर बॅलेट पेपर सिस्टीम) मतमोजणी होणार आहे. त्यानंतर इव्हिएममधील मतदानाची मोजणी सुरू होईल. सर्वात शेवटी विधानसभा मतदारसंघनिहाय पाच मतदान केंद्रांमधील व्हिव्हिपॅटची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल राहणार आहे. तसेच पोस्टल बॅलेट व इटीबीपीएसकरीता 10 टेबल असणार आहे. व्हिव्हिपॅटसाठी एक टेबल असून अशाप्रकारे एकूण 95 टेबल असणार आहे.

संपूर्ण मतमोजणी कक्षात 32 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मतमोजणीसाठी दोन केंद्रीय निवडणूक निरीक्षक असणार आहेत. एका विधानसभा मतदारसंघाकरीता 42 कर्मचारी असणार आहे. अशाप्रकारे सहा विधानसभा मतदारसंघासाठी 252 कर्मचारी राहणार असून इटीबीपीएस मतपत्रिकांच्या स्कॅनिंग करीता दोन टेबलवर 10 कर्मचारी असणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय 70 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रमाणे 420 कर्मचारी 6 विधानसभा मतदारसंघासाठी असणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे जवळपास 200 कर्मचारी मतमोजणीच्या प्रक्रियेत आहेत. त्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 150 पोलीस कर्मचारी मतमोजणी कक्षात असणार आहेत. तर 180 पोलीस कर्मचारी मतमोजणी कक्षाबाहेर नियुक्त करण्यात येणार आहेत.

मतमोजणीसाठी बुलडाणा जिल्हा प्रशासन सज्ज

मतमोजणी केंद्रात विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये संदेशवहन, माध्यम, फेरीनिहाय मतदान केंद्रनिहाय मतमोजणी संकलन, मानधन वितरण, इटिबीपीएस मतमोजणी पत्रिका स्कॅनिंग, इटिबीपीएस मतपत्रिका मोजणी, टपाली मतपत्रिका तपासणी, व्हिव्हिपॅट मोजणीसाठी तयारी, सुरक्षा, मतमोजणीनंतर सीयु/बीयु/व्हिव्हिपॅट, लिफाफे संकलन, स्टेशनरी, सिलींग कक्ष, संदेश वहन कक्ष, सार्वजनिक संदेशवहन कक्ष, सीक्रेट सील कक्षांचा समावेश असणार आहे.

Intro:Body:स्टोरी:- मतमोजणीसाठी बुलडाणा जिल्हा प्रशासन सज्ज

विधानसभा मतदारसंघनिहाय 25 फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी...

विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल...

सिसीटीव्हीच्या निगरानीत मतमोजणी...

प्रथम पोस्टल बॅलेट, इलेक्ट्रॅानिक बॅलेटनंतर ईव्हिएमची मतमोजणी...

बुलडाणा:- बुलडाणा लोकसभा मतदारसंघामध्ये 18 एप्रिल 2019 रोजी मतदान पार पडले. या मतदानाची मोजणी 23 मे 2019 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मलकापूर रोड, बुलडाणा येथे सकाळी 8 वाजेपासून सुरू होणार आहे.  या मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी केंद्रामधील कक्ष सुसज्ज करण्यात आले आहेत.

     मतमोजणीसाठी विधासनभा मतदारसंघनिहाय सहा विभाग करण्यात आले आहेत. या मतमोजणीच्या 25 फेऱ्या होणार आहेत. सर्वप्रथम पोस्टल व इटीबीपीएस (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्सफर बॅलेट पेपर सिस्टीम) यांच्या मतमोजणी होणार आहे. त्यानंतर इव्हिएममधील मतदानाची मोजणी सुरू होईल. सर्वात शेवटी प्रति विधानसभा मतदारसंघनिहाय रॅण्डमली पाच मतदान केंद्रांमधील व्हिव्हिपॅटची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर  मतमोजणीसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय 14 टेबल राहणार आहे. तसेच पोस्टल बॅलेट व इटीबीपीएसकरीता 10 टेबल असणार आहे. व्हिव्हिपॅटसाठी एक टेबल असून अशाप्रकारे एकूण 95 टेबल असणार आहे.

  संपूर्ण मतमोजणी कक्षात 32 सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया ही सीसीटीव्हीच्या निगरानीत होणार आहे. या मतमोजणीसाठी दोन केंद्रीय निवडणूक निरीक्षक असणार आहेत. त्यामध्ये नरेंद्र कुमार डुगा व भूपेंदर सिंग यांचा समावेश आहे. नरेंद्रकुमार डुगा यांना 25- मेहकर, 26- खामगांव व 27 - जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघ आणि 22- बुलडाणा, 23 - चिखली व 24- सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे निरीक्षण भुपेंदर सिंग करणार आहे.

   मतमोजणीकरीता प्रति टेबल 3 कर्मचारी राहणार असून एका विधानसभा मतदारसंघाकरीता 42 कर्मचारी असणार आहे. अशाप्रकारे सहा विधानसभा मतदारसंघासाठी 252 कर्मचारी राहणार असून इटीबीपीएस मतपत्रिकांच्या स्कॅनिंग करीता दोन टेबलवर 10 कर्मचारी असणार आहे. विधानसभा मतदारसंघ निहाय 70 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याप्रमाणे 420 कर्मचारी 6 विधानसभा मतदारसंघासाठी असणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाचे जवळपास 200 कर्मचारी मतमोजणीच्या प्रक्रियेत आहेत. त्याशिवाय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून 150 पोलीस कर्मचारी मतमोजणी कक्षात असणार आहेत. तर 180 पोलीस कर्मचारी मतमोजणी कक्षाबाहेर नियुक्त करण्यात येणार आहेत.

  मतमोजणी केंद्रात विविध कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये संदेशवहन कक्ष, माध्यम कक्ष, फेरीनिहाय मतदान केंद्रनिहाय मतमोजणी संकलन कक्ष, मानधन वितरण कक्ष, इटिबीपीएस मतमोजणी पत्रिका स्कॅनिंग कक्ष, इटिबीपीएस मतपत्रिका मतमोजणी कक्ष, टपाली मतपत्रिका तपासणी कक्ष, व्हिव्हिपॅट मोजणीसाठी तयारी कक्ष, सुरक्षा कक्ष, मतमोजणीनंतर सीयु/बीयु/व्हिव्हिपॅट, लिफाफे संकलन कक्ष, स्टेशनरी कक्ष, सिलींग कक्ष, संदेश वहन कक्ष, सार्वजनिक संदेशवहन कक्ष, सीक्रेट सील कक्षांचा समावेश असणार आहे.

बाईट:- गौरी सावंत,उपजिल्हाधिकारी, बुलडाणा

-वसीम शेख,बुलडाणा-
Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.