बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे जिल्हे ऑरेंज, ग्रीन झोनमध्ये आहेत त्यांना काही प्रमाणात सूट देण्यात येईल, असे शासनाकडून सांगण्यात आले होते. बुलडाणा जिल्हादेखील ऑरेंज झोनमध्ये येत आहे. मात्र, जिल्ह्यात 17 मेंपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु ठेवण्याचे आदेश जिल्ह्याधिकारी सुमनचंद्रा यांनी दिले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत ज्या अत्यावश्यक सेवा सुरु होत्या, त्याच सुरु राहणार आहेत. त्याच्या वेळासुद्धा सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत असणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच सोशल मीडियावर लॉकडाऊन सुरु होण्याआधीचे माझे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. ते चुकीचे असून फेक माहिती पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचेही जिल्ह्याधिकारी सुमनचंद्रा यांनी सांगितले आहे.