ETV Bharat / state

बोगस लाभार्थ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रारकर्त्याचे आमरण उपोषण

जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामउटीमध्ये खोटे दस्ताऐवज सादर करून, संजय गांधी निराधार योजनेचे हजारो रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामउटीमध्ये एका दाम्पत्याच्या नावावर 8 एकर जमीन आहे, मात्र त्यांनी खोटे दस्ताऐवज सादर करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी तक्रारकर्ते तुकाराम गटमणे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

Buldana Crime New
बोगस लाभार्थ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी
author img

By

Published : Oct 26, 2020, 9:14 PM IST

बुलडाणा- जळगाव जामोद तालुक्यातील ग्रामउटीमध्ये खोटे दस्ताऐवज सादर करून, संजय गांधी निराधार योजनेचे हजारो रुपये लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामउटीमध्ये एका दाम्पत्याच्या नावावर 8 एकर जमीन आहे, मात्र त्यांनी खोटे दस्ताऐवज सादर करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी तक्रारकर्ते तुकाराम गटमणे यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात केली आहे.

उपोषणकर्त्याने दिलेल्या तक्रारीची शाहनिशा करून, लक्ष्मण गटमणे आणि कासाबाई गटमणे या दाम्पत्याच्या नावावर जमीन असून, त्यांचे उत्पन्न 21 हजारांपेक्षा अधिक असल्याने त्यांचे नाव योजनेतून ओघळण्याचे आश्वासन तहसिलदारांनी दिले होते. मात्र अद्याप याप्रकरणी कोणतीही कारवाई न झाल्याने तुकाराम गटमणे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्याविरोधात जोपर्यंत फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच या योजनेची चौकशी केल्यास तालुक्यात अनेक फसवणुकीचे प्रकार उघडकीस येतील असे त्यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.