ETV Bharat / state

बुलडाण्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने महिलेला चिरडले - धडक

जिल्ह्यातील खामगाव ते जलंब या मार्गावर अवैध रेती वाहणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली.

बुलडाण्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने महिलेला चिरडले
author img

By

Published : Jul 20, 2019, 9:19 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यातील खामगाव ते जलंब या मार्गावर अवैध रेती वाहणाऱ्या भरधाव टिप्परने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी घडली आहे. ललिता सुपडा जाणे (वय 52 गाडेगाव बु.ता.जळगाव जामोद) असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

बुलडाण्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परने महिलेला चिरडले

या टिप्परने दुचाकीला धडक दिल्यानंतर घटनास्थळी जमलेल्या संतप्त जमावाने या टिप्परला आग लावली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परस्थिती नियंत्रणात आणली.

Intro:nullBody:बुलडाणा:- भरधाव वेगाने धावणारी वाहने नेहमीचं अपघाताला कारणीभूत ठरतात..आणि असाच एक प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव ते जलंब या मार्गावर घडला आहे. अवैध रेती वाहून नेणाऱ्या भरधाव टिप्परने रोडवरील एका दुचाकी वाहनाला जबर धडक दिली आणि या धडकेत दुचाकीवरील महिला ललिता सुपडा जाणे वय 52 गाडे गाव बु.ता.जळगाव जामोद जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. या महिलेची घरी कुणीतरी वाट पाहत असेल परंतु घरी पोहोचण्याच्या अगोदरच काळाने या महिलेवर झडप घातली आणि यात तिचा दुर्दैवी अंत झाला. या टिप्परने धडक दिल्यानंतर घटनास्थळी असलेल्या संतप्त जमावाने या टिप्परला आग लावून दिली. दरम्यान पोलिसही या ठिकाणी पोहचून परिस्थिला नियंत्रणात आणले. भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांना धडा शिकवला तर ते निदान कायद्याबद्दल भीती तरी बाळगतील. भरधाव चालवणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त प्रमाण हे रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांचेच आहे आणि अपघातालाच नव्हे तर अशा प्रकारच्या खुनाला नेमक कोण जबाबदार आहे हा सर्वात मोठा प्रश्नचिन्ह याठिकाणी उपस्थित होतोय.

बाईट:- प्रसेनजीत पाटील..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.