ETV Bharat / state

Gajanan Maharaj Prakat Din 2023: संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिन सोहळा; विदर्भाची पंढरी भाविकांनी फुलली, शेगावात भक्तांची मांदियाळी - प्रकट दिन सोहळा

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत नगरी शेगावात आज गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिन सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. यासाठी मोठ्या संख्येत भाविक शेगाव नगरीमध्ये दाखल झाले आहेत. शेगाव नगरीत भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

Gajanan Maharaj Prakat Din 2023
संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिन सोहळा
author img

By

Published : Feb 13, 2023, 10:49 AM IST

संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकट दिन सोहळा

शेगांव : राज्यभरातूनच नव्हे तर देशभरातून असंख्य भाविक संत नगरी शेगावमध्ये दाखल झाले आहेत. संतनगरी शेगावात पायी दिंड्या देखील गेल्या आठ दिवसापासून दाखल होत आहेत.
गण गण गणात बोतेच्या गजरात या पाय दिंड्या संत नगरी शेगावात दाखल झाल्या आहेत. आज शेगाव गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मोठा प्रगट दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये दर्शन बारीत श्री गजानन महाराजांचे नामस्मरण करीत भाविक शिस्तीत व शांततेत समाधीचे दर्शन घेत आहेत.

लाखो भाविक संतनगरीमध्ये दाखल : आज श्रींच्या 145 व्या प्रकट दिन सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत नगरीमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. गावागावाचे भावी पायदळ करत शेगावला पोहोचले आहेत. प्रकट दिनाचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांना ओढ लागलेली दिसून येते. धरा पाऊलांनो शेगावाची वाट, देवरूप घेऊन आले गजानन स्वामी झाले असे भाविक आपल्या नाम स्मरणात म्हणत आहेत. आतापर्यंत शेकडो भजनी दिंड्यांची हजेरी संतनगरीत लागली आहे. आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची पालखी नगर परिक्रमा करत निघणार आहे. संपूर्ण मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन करण्याकरिता स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने सेवा देत आहे.

भाविकांची एकच गर्दी : भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, याकरिता मागील 24 तासापासून मंदिर हे भाविकांच्या दर्शनाकरिता खुले आहे. सध्या जवळपास तीन ते चार तास भाविकांना दर्शनाकरता लागत आहेत. आज दुपारी श्रींच्या प्रकट दिनानिमित्त जयघोष होईल. यावेळी मंदिराच्या दिशेने भाविक फुलांचा वर्षाव करतात, ते क्षण डोळ्याचे पारणे फेडणारे असतात. श्रींच्या मंदिरात पारायण कक्षात शेकडो भावी गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहेत. प्रगट दिन उत्सवानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान शहरातील ठिकठिकाणी महाप्रसाद वितरण करण्यात येते. विविध ठिकाणाहून आलेले भावी महाप्रसादाचा लाभ घेतात. शेगाव शहरात संत गजानन महाराज दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली आहे.

श्रींच्या दर्शनासाठी मंदिर 24 तास सुरू : श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने प्रकट दिन सोहळ्यानिमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्रींचे समाधी दर्शन 24 तास सुरू ठेवण्यात आले आहे. जवळपास एक हजाराच्या वर दिंड्यांचे आगमन झाले आहे. जय गजानन श्री गजानन मुखी हरिनाम घ्यावे, पुढे पाऊल टाकावे वारकरी भक्त मंडळी नाम जप करीत, गण गण गणात बोते मंत्राचा नाम जप, जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असा श्री नामाचा टाळ मृदुंगाचा गजर करीत जवळपास एक हजारापेक्षा जास्ती भजनी दिंडी संतनगरी दाखल झाले आहेत. भजनी दिंडी श्रींचे मंदिर येताच श्रींच्या समाधीचे व कळसाचे दर्शन घेऊन नित्य मार्गाने जात आहेत. एकंदरीत संपूर्ण संत नगरी आज गण गण गणात बोतेच्या नामस्मरणात न्हाहून निघाली आहे.

हेही वाचा : Gajanan Maharaj Prakatdin 2023 : यंदा श्री संत गजानन महाराजांचा 145 वा प्रकटदिन; धुमधडाक्यात होणार साजरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.