ETV Bharat / state

नायलॉन मांजा आढळल्यास होणार फौजदारी कारवाई - washim news

मकरसंक्रातीच्या निमित्ताने सर्वत्र रंगबेरंगी पंतग व विविध प्रकारच्या मांजाची दुकाने सजली आहेत. बंदी असूनही नायलॉन मांजाची सर्रास विक्री होताना दिसत आहे. जर नायलॉन मांजा विक्री करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.

नायलॉन मांजा
नायलॉन मांजा
author img

By

Published : Jan 13, 2021, 8:22 PM IST

Updated : Jan 13, 2021, 8:30 PM IST

बुलडाणा - मकर संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडविण्याची परंपरा असून, हा उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, पतंग उडविताना नायलॉन मांजावर बंदी असूनही त्याची सर्रास विक्री व वापर होत असेल तर त्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा पोलिस अधिक्षकांनी दिला आहे.

बुलडाण्यात नायलॉन मांजा आढळल्यास होणार फौजदारी कारवाई
नायलॉन मांजावर बंदी आणण्यासाठी वन्यजीव सोयरे यांनी केली होती मागणी-घातक मांजामुळे अनेक पशु-पक्षी व नागरिकांना प्राणास मुकावे लागले आहे. नायलॉन, चायनीज मांजा विक्री व बाळगण्यास बंदी आणलेली असताना मांजाचे व्यापारी विक्री करताना दिसत आहे. बुलडाण्यातील वन्यजीव सोयरे यांनी नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आणावी, अशी मागणी केली होती. नायलॉन मांजा नागरिकास आणि प्राण्यास हानिकारक असून या नायलॉन मांजावर बंदी आणल्याचा आदेश जिल्हाधिकारी शंकर राममूर्ती यांनी 11 जानेवारीला दिला आहे. तसेच नायलॉन मांजाचा वापर करु नये आणि ज्यांच्याकडे नायलॉन मांजा असेल त्यांनी जमा करावा, असे आवाहन करीत नायलॉन मांजा विक्री व वापर करणाऱ्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिला आहे.नायलॉन मांजा विकत नाही - विक्रेता नायलॉन मांजा पक्षींना घातक असल्याने कधीपासून नायलॉन मांजा विकत नाही आणि सध्या शासनाने यावर बंदी आणलेली आहे. माझ्याकडे चौकशी केली गेली. मात्र मी साहेबांना सांगितले मी नायलॉन मांजा विकत नाही. सोबतच शहरात जेवढी मांजा विक्रेता आहे. त्या सगळ्यांना सांगितले आहे की, नायलॉन मांजा विकू नका आणि असल्यास ते जमा करून द्या. सध्या शहरात असलेले पतंग आणि मांजा विक्रेता नायलॉन मांजा विकत नाहीत, अशी प्रतिक्रिया भगवान महावीर मार्गावरील पतंग व मांजा विक्रेता शेख अजीज यांनी दिली.

Last Updated : Jan 13, 2021, 8:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.