बुलडाणा - 10 मेनंतर बुलडाणा शहरात पुन्हा कोरोनाने प्रवेश केला आहे. परदेशातून परतलेला एक विद्यार्थी आज (गुरुवारी) मध्यरात्री कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे हा विद्यार्थी क्वारंटाईन काळ संपण्यापूर्वीच पळाला होता. नंतर त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. संबंधित विद्यार्थी अनेकांच्या संपर्कात आल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या विद्यार्थ्याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले.
कोरोनाबाधित रुग्ण बुलडाणा शहराच्या धाड नाका परिसरात राहतो. अहवाल येण्याच्या अगोदर हा विद्यार्थी क्वारंटाईन ठिकाणावरून पळून गेल्याने त्याच्यावर बुलडाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त मोताळा तालुक्यातील सावरगाव जहांगीर येथे एक तर मलकापूर शहरातील एका व्यवसायिकाकडे अकाउंटिंगचे काम करणारा 38 वर्षीय व्यक्ती देखील कोरोनाबाधित आढळला आहे. सध्या बुलडाणा जिल्ह्यात 53 कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे.
फिलिपिन्स या देशात शिकणाऱ्या 10 विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या वंदेभारत योजनेतून बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास आणले. 12 मेला अंदाजे 6 ते 7 विद्यार्थी आले बुलडाणा तहसीलदार यांच्या देखरेखीखाल शहरातील बुलडाणा अर्बन रेसिडेंसी हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा 22 मेला 5 ते 6 विद्यार्थी आल्यानंतर त्यांनाही त्यांच हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांपैकी एकाच्या पालकाने आपल्या मुलाच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यासंदर्भात हट्ट केल्यामुळे 22 मे रोजी या सगळ्या विद्यार्थ्यांचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. धाड नाक्याजवलील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचे अहवाल येणे बाकी होते.
निगेटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांची हॉटेलमधून सुट्टी झाली. दरम्यान, क्वारंटाईन काळ पूर्ण न होता व स्वॅब नमुन्याचा अहवाल येण्यागोदरच कोरोनाबाधित विद्यार्थ्याने देखील हॉटेलमधून पळ काढला. यावेळी हा विद्यार्थी अनेकांच्या संपर्कात आला असून, शहरभर फिरत बसला तसेच एका सलूनमध्ये केस सुद्धा कापले. मात्र, या विद्यार्थ्याचा अहवाल कोरोनाबाधित आढळला. यावेळी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली. दरम्यान, या विद्यार्थ्याला त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले. या कोरोनाबाधीत विद्यार्थ्याच्या ससंपर्कात आलेल्या जवळपास 78 कुटुंबांना क्वारंटाईन करण्यात आले असून रुग्णाचे रहिवासी आणि ज्या ठिकाणी रुग्णाचे केस कापले तो परिसर सील करण्यात आले आहे. अहवाल येण्यापूर्वीच बाहेर पडल्यामुळे या रुग्णांवर राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा 2005 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.