ETV Bharat / state

बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; पाच रुग्णांचा कोरोनावर विजय - बुलडाणा कोरोना न्यूज

सोमवारी 5 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. उपचार घेतल्यानंतर या पाच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.

corona patient getting cure in buldana
बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; पाच रुग्णांचा कोरोनावर विजय
author img

By

Published : Apr 20, 2020, 2:45 PM IST

बुलडाणा - जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. सोमवारी 5 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. उपचार घेतल्यानंतर या पाच रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे त्यांना आज सोमवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल होताना दिसत आहे.

बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; पाच रुग्णांचा कोरोनावर विजय
जिल्ह्यात 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर उर्वरीत 20 रुग्णांवर जिल्हा स्त्री रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. त्यापैकी 17 एप्रिलला तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना सोडण्यात आले. तर आज सोमवारी परत 5 रुग्ण बरे झाल्याने त्यांना देखील टाळ्या वाजवत निरोप देण्यात आला. आता जिल्ह्यात 12 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सोडण्यात आलेले हे पाच रुग्ण दिल्ली मरकजवरून आल्याने त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. हे रुग्ण खामगावमधील येथील 1, शेगाव 1, सिंदखेड राजा मधील 1, देऊळगाव राजा मधील 1 तर चिखली मधील 1 यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.