बुलडाणा - शहरातील उप वनसंरक्षक कार्यालयासमोर लघु दाब वाहिनीच्या विद्युत पोलवर चढून कर्मचारी काम करीत होता. तारेमध्ये अचानक विद्युत प्रवाह आल्याने विद्युत महावितरणात बायस्त्रोत तंत्रज्ञ 26 वर्षीय कंत्राटी कर्मचाऱ्यांचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहरातील सोळंके ले आउटमधील योगेश शामराव काळे असे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून तो अविवाहित होता, तो विद्युत महावितरणात बायस्त्रोत तंत्रज्ञ या पदावर कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत कार्यरत होता.
चिखली रोडवरील उप वनसंरक्षक कार्यालयासमोर लघु दाब वाहिनीच्या विद्युत पोलवर चढून योगेश काळे काम करत होते. काम करण्यासाठी त्या परिसरातील डीपीमधील विद्युत प्रवाह बंद करण्यात आला होता. असे असतांना काम करीत असलेल्या तारेमध्ये अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्याला वीजेचा धक्का लागला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ अग्निशमन विभागाला पाचारण करीत योगेश काळे याला पोलवरून खाली उतरून तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपस्थित डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी योगेशला वाचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र त्यांना अपयश आले.
'या कारणाने तारेमध्ये विद्युत पुरवठा आला असावा'
डीपीमधील विद्युत पुरवठा बंद करून लघु दाब वाहिनीच्या विद्युत पोलवर काम करीत असतांना अचानक तारेत विद्युत पुरवठा कोठून आला. परिसरातील कनिष्ठ अभियंतांना याबाबत विचारले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र याबाबत बुलडाणा विभागाच्या उपकार्यकारी अधिकारी हेलोडे यांना विचारल्यावर ते म्हणाले की, विद्युत पोलावर अर्धा तासापासून काम सुरू होते. डीपीमधील विद्युत पुरवठा बंद होता. मात्र कोणाचा इन्व्हेटर किंवा जरनेटर सुरू झाला असेल, हा विद्युत पुन्हा पोलावरील तारेमध्ये आले असावे, म्हणून विद्युत पोलवर काम करणाऱ्या योगेश काळे यांना वीजेचा धक्का लागला असेल, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.