ETV Bharat / state

लॉकडाऊन अंमलबजावणीत कुचराई झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरू- डॉ राजेंद्र शिंगणे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी बुलडाणा जिल्ह्यामध्ये करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले. तसेच अंमलबजावणीत कुचराई झाल्यास जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरू, अशी भूमिका पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे.

लॉकडाऊन अंमलबजावणीत कुचराई झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरू- डॉ राजेंद्र शिंगणे.
लॉकडाऊन अंमलबजावणीत कुचराई झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरू- डॉ राजेंद्र शिंगणे.
author img

By

Published : Apr 14, 2021, 5:16 PM IST

बुलडाणा - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी बुलडाणा जिल्ह्यामध्ये करा, असे निर्देश पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी दिले. तसेच अंमलबजावणीत कुचराई झाल्यास जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरू, अशी भूमिका पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. या रुग्णसंख्येवर आळा घालण्याच्या दृष्टीकोनातून मुख्यमंत्र्यांनी 14 एप्रिलच्या रात्री आठ वाजता पासून संपूर्ण महाराष्ट्रात 144 कलम लागू करून लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकाडाऊनची कठोर अंमलबजावणी बुलडाणा जिल्ह्यात करण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांची समन्वय बैठक आज बुधवारी 14 एप्रिल रोजी बुलडाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.

लॉकडाऊन अंमलबजावणीत कुचराई झाल्यास जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरू- डॉ राजेंद्र शिंगणे.

या बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमूलकर, आमदार संजय कुटे, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेताताई महाले उपस्थित होते. तर प्रशासनातील अधिकारी जिल्हाधिकारी रामामुर्ती जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया जिल्हा शल्यचिकित्सक नितीन तडस आरोग्य अधिकारी सांगळे व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक लॉकडाऊनची गरज-

कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन कडक होणे गरजेचे आहे, असे मत बैठकीत लोकप्रतिनिधींनी व्यक्त केले. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी यांना संपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली असून कडक अंमलबजावणीची प्रक्रिया जिल्हाधिकारी यांनी समन्वय साधून करावी, असे निर्देश देत आणि जर लॉकडाऊनच्या अंमलबजावणीत कुचराई झाल्यास जिल्हाधिकारी यांना जबाबदार धरू, अशी भूमिका बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे.

होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारा -

या बैठकीत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारण्याच्या सूचनाही आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. या शिवाय नागरिकांनी सुद्धा घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.

हेही वाचा- पोलिसांच्या मारहाणीत 'सलून' चालकाचा मृत्यू, नातेवाईकांचा पोलीस ठाण्यासमोर मृतदेहासह ठिय्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.