बुलडाणा - कोरोनाने हाहाकार माजविला असताना दुसरी, तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याचेही भाकित तज्ज्ञांनी वर्तविले असताना बुलडाण्यात एक धक्कादायक प्रकार व्हायरल व्हिडिओमुळे समोर आला आहे. जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांचा संग्रामपूर तालुक्यात दौरा होता. जिल्हाधिकारी आपल्या शाळेतील कोरोनाबाधितांच्या विलगीकरण सेंटरला भेट देवू शकतात, म्हणून संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात 15 कोरोनाबाधित रुग्ण असताना तेथील स्वछतागृहाची एका 8 वर्षाच्या शाळकरी मुलाकडून हाताने साफसफाई करून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मुलाला साफसफाई करण्यासाठी धमकविण्यात आल्याचेही समोर आले आहे. मुलांकडून साफसफाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या परिसरात प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे.
कोरोनाबाधित रुग्ण असताना विलगीकरण कक्षाच्या स्वछतागृहांची शाळकरी मुलाकडून हाताने स्वच्छता, बुलडाण्यातील प्रकार - बुलडाणा
बुलडाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात 15 कोरोनाबाधित रुग्ण असताना तेथील स्वछता गृह एका चिमुरड्या 8 वर्षाच्या मुलाकडून हाताने साफसफाई करून घेण्यात आले.