ETV Bharat / state

बकरी ईद घरीच आणि साधेपणाने साजरी करा.. मौलाना, समाजसेवकांकडून आवाहन - Celebrate Bakra Eid at home

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नियमांचे पालन करून सर्वांनी बकरी ईद घरीच साजरी करावी. नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेत बकरी ईद साजरी करावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.

Jama Masjid Buldana
जामा मस्जिद बुलढाणा
author img

By

Published : Aug 1, 2020, 3:22 AM IST

बुलडाणा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार नियमांचे पालन करून सर्वांनी बकरी ईद घरीच साजरी करावी. नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेत बकरी ईद साजरी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वांनी बकरी ईद घरीच साजरी करा, असे आवाहन बुलडाण्यातील जामा मस्जिदचे मौलाना हाफिज रहेमत कुरेशी, समाजसेवक मोहम्मद अजहर यांनी केले आहे.

बकरी ईद घरीच आणि साधेपणाने साजरी करण्याचे मौलाना आणि समाजसेवकांकडून आवाहन

कोरोनामुळे बुलडाणा जिल्ह्यात बाराशेहून अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा गेला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा पोलीस प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. एका दिवसांवर आलेल्या बकरी ईद हा सण घरीच साजरा करावा. नियमांचे कुठेही उल्लंघन होणार नाही. तसेच नियमाचे पालन करून घरीच नमाज अदा करावी, असे जामा मस्जिदचे मौलाना हाफिज रहेमत कुरेशी आणि बुलडाण्यातील समाजसेवक मोहम्मद अजहर यांनी मुस्लिम समुदायाला केले आहे.

हेही वाचा - आंध्र प्रदेशात सॅनिटायझर प्यायल्याने नऊ मद्यपींचा मृत्यू

विशेष म्हणजे रमजान ईद वेळीही समाजसेवक मोहम्मद अजहर यांनी कपड्याची खरेदी न करून साधेपणाने ईद साजरी करण्याचे मुस्लिमांना आवाहन केले होते. हे आवाहन मुस्लिम समुदायांनी शंभर टक्के मानून अत्यंत साधेपणाने रमजान ईद साजरी केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.