ETV Bharat / state

कोविड टेस्ट न करता रूग्णांवर उपचार; रूग्णाचा मृत्यू झाल्याने खासगी रूग्णालयाविरोधात दुसरी तक्रार दाखल - बुलडाणा खासगी रूग्णालय गुन्हा बातमी

गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. विविध रूग्णालयांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार केले जात आहेत. बुलडाण्यातील एका खासगी रूग्णालयात कोविड टेस्ट न करता रूग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

buldana latest corona Update
बुलडाणा लेटेस्ट कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 29, 2021, 9:40 AM IST

बुलडाणा - खामगाव येथील डॉ. आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांची कोविड चाचणी न करताच न्यूमोनियाचे रूग्ण सांगून त्याच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा समोर आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णाला 14 रेमडेसिवीर इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले गेल्याचा आणि 3 दिवसाच्या उपचारांचे अडीच लाख रुपये बिल काढल्याचे आरोप करण्यात आले आहेत. प्रकरणी मृत रूग्णाचा मुलगा योगेश बोबडे थेट मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, बुलडाण्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, उपविभागीय पोलीस अधिकारी व खामगाव शहर पोलीस निरीक्षकांकडे मंगळवारी (27 एप्रिल) तक्रार दाखल दिली. रूग्णालयाचे मालक डॉ. आशिष अग्रवाल यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच रूग्णालयात काही दिवसांपूर्वी 35 वर्षीय रुग्णाची कोविड टेस्ट न करता सुरू असलेल्या उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.

बुलडाण्यातील एका खासगी रूग्णालयात कोविड टेस्ट न करता रूग्णांवर उपचार सुरू असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला

काय आहे प्रकरण -

खामगाव येथील योगेश बोबडे यांनी त्यांच्या 73 वर्षीय आईला 23 एप्रिलला डॉ. आशिष अग्रवाल यांच्या लाईफ लाईन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉ. अग्रवाल यांनी तपासणी करून काही औषधींसह 14 रेमडेसिवीर इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले. यावर तक्रारदार योगेश यांनी डॉ. अग्रवाल यांना आईच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. त्यावर आईच्या छातीत संसर्ग झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, रेमडेसिवीर इंजेक्शन व कोरोनाच्या औषधी डॉ. अग्रवाल यांनी लिहून दिले होते. मात्र, त्या अगोदर कोविडची तपासणी केली नाही, असा आरोप योगेश बोबडे यांनी केला आहे. बोबडे यांची आई 23 एप्रिल ते 26 एप्रिलपर्यंत रूग्णालयात होत्या. 26 एप्रिलला त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. न्युमोनियामुळे मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. सोबत हॉस्पिटलचे 2 लाख 50 हजार रुपयांचे बिलही देण्यात आले. अशा प्रकारे माझ्या समक्ष सहा रूग्ण दगावले आहे. हा डॉ. आशिष अग्रवाल यांचा निष्काळजीपणा असल्याचा आरोप योगेश बोबडे यांनी केला.

डॉ. अग्रवाल विरोधात दुसरी तक्रार -

खामगावातील खासगी लाईफ लाईन रुग्णालयात शेगावातील 35 वर्षीय रुग्णाला कोरोना चाचणी न करता रेमडेसिवीरचे डोज दिले गेले होते. यातच या रुग्णाचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या रुग्णाच्या एचआरसिटी अहवालामध्ये कोरोनाचा 25 पैकी 20 स्कोर आल्यानंतरही कोरोना प्रोटोकॉलप्रमाणे मृतदेह न देता सर्व सामान्य आजाराने मृत्यू झाल्या सारखा मृतदेह अंत्यसंस्कार देण्यात आला होता. अंत्यसंस्कारानंतर मृत रूग्णाचे चारही नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मृताचे नातेवाईक डॉ. प्रकाश दाभाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि तहसीलदारांकडे तक्रारी केलेली आहे.

नियमांविरुध्द वागणाऱ्यांवर कारवाई होणारच - जिल्हा शल्यचिकित्सक

खामगावचे डॉ. आशिष अग्रवाल हे त्यांच्या रुग्णालयामध्ये कोविड रूग्ण भरती करून उपचार करत आहे. तिथे प्रोटोकॉलनुसार रुग्णालयाचे कामकाज चालत नाही, अशा तक्रारी आल्या आहेत. चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू. जो नियमांविरुद्ध वागतो त्याच्यावर आम्ही कारवाई करतोच, अशी प्रतिक्रिया जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी दिली.

डॉ. अग्रवाल यांचा प्रतिसाद नाही -

डॉ. आशिष अग्रवाल यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

हेही वाचा - कोरोनाला हाताळण्यासाठी 4 हजार 923 एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.