ETV Bharat / state

बंदुकीच्या धाकावर व्यापाऱ्याला  लुटले;  व्यापाऱ्यांनीच चोरट्यांना लावले पिटाळून - bussinessman robbed in buldana

उटी तालुक्याच्या मेहकर येथील कैलास मोतीराम आंधळे यांचे जानेफळ येथे शिवकृपा कृषी केंद्र आहे. नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद करून ते शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या क्रुझर (एम.एच २८ झेड ४९२०) गाडीने आपल्या बंधूंबरोबर गावी परतत होते. त्यादरम्यान चोरट्यांनी त्यांना लुटले.

हीच ती गोळीबार झालेली क्रुझर
author img

By

Published : Jul 28, 2019, 2:11 PM IST

बुलडाणा - व्यापाऱ्याच्या वाहनावर गोळीबार करीत त्याला लुटल्याची घटना जिल्ह्यातील खामगाव मेहकर या मार्गावर घडली आहे. शनिवारी २७ जुलैच्या रात्री ही घटना घडली. यात चोरट्यांनी व्यापाऱ्याकडील एक लाख रुपयांची बॅग चोरून घटनास्थळावरून धूम ठोकली. पोलिसांनी जिल्हाभर नाकेबंदी करत घटनेचा तपास सुरू केला आहे.

हीच ती गोळीबार झालेली क्रुझर

उटी तालुक्याच्या मेहकर येथील कैलास मोतीराम आंधळे यांचे जानेफळ येथे शिवकृपा कृषी केंद्र आहे. नेहमीप्रमाणे कृषी केंद्र बंद करून ते शनिवारी रात्री साडेआठ वाजता आपल्या क्रुझर (एम.एच २८ झेड ४९२०) गाडीने आपले बंधू किशोर मोतीराम आंधळे, महादेव मोतीराम आंधळे व गोपाल दौलत धोटे, तसेच गाडी चालक शेख लतीफ शेख नूर यांच्यासमवेत आपल्या गावी परत जात होते. दरम्यान जानेफळ नजीक उटी फाटा दरम्यान असलेल्या नाल्या नजीक मोटर सायकलसह रोडवर झोपून असलेल्या तिघांनी त्यांना अडवले. अपघात झाल्याचा देखावा करीत रस्त्यावरच पडून असल्यामुळे, तसेच बाजूने गाडी काढण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रोडवर पडून असलेल्या तिघांना मदतकरण्यासाठी कैलास आंधळे गाडीबाहेर उतरले. यावेळी रस्त्यावर अपघात झाल्याचा देखावा करणाऱ्या तिघांपैकी एकाने कैलास आंधळे यांच्या गळ्याला चाकू लावला, तर इतर दोघांनी क्रुझर चालक शेख लतीफ शेख नुरा याच्या कानशिलावर रिव्हॉल्वर लावून क्रुझर गाडीची चावी काढून घेतली.

यावेळी चोरट्यांनी क्रुझरमध्ये असलेल्यांना पळून लावण्याच्या दृष्टीने गाडीवर गोळीबार केला. मात्र, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर कैलास आंधळे यांनी एका दरोडेखोराच्या हाताला हिसका दिली व त्यांच्या गळ्याला लावलेला चाकू घेऊन रिवॉल्वर असलेल्या इतर दोन चोरट्यांच्या अंगावर धावले. त्यामुळे चोरट्यांनी तेथून पळ काढला. मात्र, जाताना चोरटे क्रुझरमधील एक लाख रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन फरार झाले. यावेळी त्यांनी आपली मोटरसायकल (एम. एच २८ एडी २७७९) जागेवरच सोडली. घटनेची माहिती मिळताच उटी येथील गावकऱ्यांची घटनास्थळावर एकच गर्दी केली होती.

Intro:Body:बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव मेहकर या मार्गावर शनिवारी 27 जुलैच्या रात्री एका व्यापाऱ्याच्या वाहनावर गोळीबार करीत लुटण्याचा प्रयत्न झाला यामध्ये लुटारूंनी एक गोळी वाहण्याच्या दिशेने झाडून दगडफेक केली या घटनेत एक जण जखमी झाला असून दरोडेखोरांनी एक लाख रुपयांची बैग पडवली असून आपली दुचाकी सोडून घटना स्थळावरून दरोडेखोरांनी रात्री पळ काढला दरम्यान पोलिसांनी जिल्हाभरात नाकेबंदी करीत घटनेचा तपास सुरू केला आहे यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

उटी तालुका मेहकर येथील कैलास मोतीराम आंधळे यांच व्यापाऱ्याचे जानेफळ येथे शिव कृपा कृषी केंद्र असून ते नेहमीप्रमाणे बंद करून शनिवारी रात्री साडेआठ वाजता बंद करून आपल्या क्रूजर गाडी क्रमांक एम एच 28 झेड 4920 मधून आपले बंधू किशोर मोतीराम आंधळे महादेव मोतीराम आंधळे व गोपाल दौलत धोटे तसेच गाडी चालक शेख लतीफ शेख नूर यांच्यासमवेत आपल्या गावी परत असताना जानेफळ नजीक उटी फाटा दरम्यान असलेल्या नाल्या नजीक मोटर सायकल सह रोडवर झोपून असलेल्या तिघांनी अपघात झाल्याचा देखावा करीत रस्त्यावरच पडून असल्यामुळे तसेच बाजूने गाडी काढण्यासाठी रस्ता नसल्यामुळे रोडवर पडून असलेल्या तिघांना मदतीसाठी खाली उतरलेल्या कैलास मोतीराम आंधळे यांना एकाने गळ्याला चाकू लावला तर दुसऱ्या दोघांनी आपल्याजवळ असलेल्या दोन रिव्हालरी ने क्रुझर चालक शेख लतीफ शेख नुरा याच्या कानशिलावर लावून क्रुझर गाडीची चावी काढून घेतली आणि क्रुझर मध्ये असलेल्यांना पळून लावण्याच्या दृष्टीने क्रुझर गाडीवर गोळीबार केला यात क्रूजर च्या समोरच्या काचातुन गोळी आत मध्ये घुसली परंतु सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर कैलास मोतीराम आंधळे यांनी एका दरोडेखोराच्या हाताला हिसका देत त्यांच्या गळ्याला लावलेला चाकू घेऊन रिवाल्वर असलेल्या दोघांच्या अंगावर धावले त्यामुळे त्यांनी पळ काढला आणि जाताना क्रुझर मध्ये असलेली बॅग आणि त्यामध्ये असलेले एक लाख रुपये घेऊन फरार झाले यावेळी त्यांनी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 28 एडी 2779 जागेवरच सोडली आहे. घटनेची माहिती मिळताच उटी येथील गावकऱ्यांची घटनास्थळावर एकच गर्दी झाली होती..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.