बुलढाणा : जिल्ह्यातील मलकापूर येथे दोन दिवसापूर्वी एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांची जाहीर सभा पार पडली होती. या सभेदरम्यान काही उपस्थितांपैकी काहींनी समाजाला तेढ निर्माण करतील, अश्या घोषणा केल्या होत्या. या संदर्भात अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे वृत्त समाज माध्यमांमधून एका व्हिडिओद्वारे व्हायरल झाले होते. काही माध्यमांनी देखील तसे प्रसारित केले होते. यावरून ही कारवाई करण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
या संदर्भात आता फॉरेन्सिक यंत्रणेमार्फत तपासणी केली जाईल. - जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एमआयएमचे खासदार ओवेसी यांची सभा पार पडली. या सभेदरम्यान औरंगजेबाच्या समर्थनार्थ 'जब तक सुरज चांद रहेगा औरंगजेब तेरा नाम रहेगा' अशा प्रकारचे नारे दिल्या गेल्या असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर या व्हिडिओची संपूर्ण राज्यभरात मोठी चर्चा झाली. या प्रकरणी सोमवारी अकोला अमरावतीत ओवेसींनी अशा प्रकारचे नारेबाजी झाले नसल्याचे म्हणत माध्यमांवर नाराजी व्यक्त केली. मात्र आता बुलढाणा जिल्हा पोलीस याप्रकरणी ॲक्शन मोडवर आल्याचा पाहायला मिळत आहे. त्यांनी मलकापूर शहर पोलिसात या व्हिडिओची दखल घेत अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल केले आहे.
अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल : मात्र या व्हिडिओसाठी फॉरेन्सिक टीमकडे हा व्हिडिओ पाठवून खरेच औरंगजेबाच्या समर्थनार्थ या व्हिडिओतून नारेबाजी स्पष्ट होते का किंवा त्या सभेत अशा प्रकारचे नारेबाजी झालेली आहे का? याची तपासणी बुलढाणा पोलीस आता करताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे जर औरंगजेबाच्या समर्थनार्थ नारेबाजी झाली असेल तर कार्यक्रमाच्या आयोजकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल केले जाऊ शकतात.
हेही वाचा :