ETV Bharat / state

बुलडाण्यात दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास; डॉ. राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांच्यात मुख्य लढत - dr rajendra shingane

लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. तर बुलडाण्यात आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव या दोन्ही उमेदवारांनी विजय आपलाच होणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीला मिळणारे मतदान निर्णायक ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीला 1 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली तर याचा फटका आघाडीचे उमेदवार डॉ. शिगणेंना बसणार आहे.

बुलडाण्यात दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास
author img

By

Published : May 22, 2019, 7:13 AM IST

Updated : May 22, 2019, 8:20 AM IST

बुलडाणा - लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. तर बुलडाण्यात आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव या दोन्ही उमेदवारांनी विजय आपलाच होणार असल्याचा दावा केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीला मिळणारे मतदान निर्णायक ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीला 1 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली तर याचा फटका आघाडीचे उमेदवार डॉ. शिगणेंना बसणार आहे.

बुलडाण्यात दोन्ही उमेदवारांना विजयाचा विश्वास; डॉ. राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांच्यात मुख्य लढत
बुलडाणा लोकसभेसाठी 18 एप्रिल रोजी 63.53 टक्के मतदान झालं. जिल्ह्यात एकूण १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी ३ उमेदवारांमध्ये खरी लढत असणार आहे. यावेळी युतीकडून शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यात खरी लढत आहे. या दोन्हीही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा केला आहे.

2009 मध्ये 29 हजार मताधिक्याने प्रतापराव जाधव निवडून आले होते. तर 2014 मध्ये मोदी लाटेत त्यांना 1 लाख 60 हजाराचं मताधिक्य मिळालं होतं.मात्र, यावेळी वंचित बहुजन आघाडीकडून आमदार बळीराम शिरस्कार रिंगणात आहेत. जनता आपले मत कोणाच्या पदरात टाकणार हे काही तासात स्पष्ट होईल.

Intro:Body:बुलडाणा :- बुलडाणा लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाचा निकाल अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय...तर बुलडाण्यात आघाडीच्या राष्ट्रवादी चे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे आणि युतीच्या शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव या दोन्ही उमेदवारांनी आपल्या विजयाचा दावा करत आहात त्यामुळे निकालाची उत्सुकता शिगेला पोहचलीय मात्र यावेळी वंचित बहुजन आघाडीला मिळणारे मतदान निर्णायक ठरणार आहे यासंबधी राजकीय विश्लेषक ही मानतात की वंचित बहुजन आघाडीला दिढ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली तर याचा फटका आघाडीचे उमेदवार डॉ.शिगणेंना फटका बसणार आहे..

बुलडाणा लोकसभेसाठी 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले.63.53 टक्के मध्ये 11 लाख 17 हजार मतदारांनी आपले मतदानाचा हक्क बजावले आहे.यावेळी युतीकडून शिवसेनेचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रतापराव जाधव तर आघाडी कडून राष्ट्रवादी चे उमेदवार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये ही सरळ लढत पाहायला मिळाली..तर दोन्हीही उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत.. निवडणूक प्रचार दरम्यान दोन्ही उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप करण्यात आलेत ज्यामध्ये विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी गेल्या दहा वर्षात कुठलेच विकास कामे केले नाहीत , जनतेशी संपर्क ठेवला नाही , स्वतःच्या विकास कामांवर नव्हे तर फक्त मोदींच्या नावावर मत मागण्यात आले असल्याचा आरोप डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केलाय...आणि याच मुद्द्यावर जनता मला निवडून देणार असल्याचा विश्वास शिंगणे यांनी व्यक्त केलाय...

बाईट :- डॉ. राजेंद्र शिंगणे (उमेदवार, आघाडी)

तर जिल्ह्यात आम्ही विविध विकास कामे केलीत त्याच विकास कामांच्या जोरावर परत एकदा सत्तर हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्याने जनता निवडून देणार असल्याचा दावा विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी केलाय तर मोदीच देशासाठी उपयुक्त पंतप्रधान असून त्यांच्याच हातात देश सुरक्षित राहील..शिवाय काँग्रेस च्या 65 वर्षांमध्ये जी कामे झाली नाहीत ती कामे या पाच वर्षात झालीत त्यासाठी जनता कौल हा मोदीलाच देणार आहे आणि आलेले एक्झिट पोल हे शंभर टक्के खरे ठरणार आहेत. असे मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले आहे तर शिवसेनेने राज्यात 23 जागा लढवल्या आहेत त्यापैकी 20 ते 22 जागा आम्ही जिंकणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

बाईट :- खा.प्रतापराव जाधव (युती उमेदवार)

विशेष म्हणजे सन 2009 मध्ये बुलडाणा लोकसभेमध्ये आजच्या निवडणुकीसारखी पाहवयास मिळत आहे.आघाडीच्या राष्ट्रवादी चे उमेदवार डॉ.राजेंद्र शिंगणे आणि युतीच्या शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्यामध्ये लढत आहे.2009 मध्ये 29 हजार मताधिक्याने विद्यमान खा.प्रतापराव जाधव निवडून आले होते तर 2014 मध्ये मोदी ताटेमध्ये 1 लाख 60 हजार मताधिक्याने प्रतापराव जाधव निवडून आले होते.मात्र यावेळी भारिप बहुजन महासंघाचे ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआयएम ला सोबत घेत वंचित बहुजन आघाडी स्थापित केली.बुलडाण्यातून बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कार यांनी निवडणूक लढविली आहे.

P2C :-वसीम शेख

बाईट:- अरुण जैन,राजकीय विश्लेषक, बुलडाणा

दोन्ही उमेदवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत मात्र वंचित बहुजन आघाडीची भूमिका यामध्ये महत्वपूर्ण राहणार असून हाच उमेदवार दोन्ही दिग्गज उमेदवारांचे भविष्य ठरवणार आहे , यामुळेच जिल्ह्यात विजयाबाबत तर्क-वितर्क लावत आहे.दोन्ही उमेदवार आपला विजयाचा दावा करत आहेत मात्र जनता आपले मत कुणाच्या पदरात टाकले व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला किती मते मिळतात हे काही तासात निश्चित होणार आहे.

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
Last Updated : May 22, 2019, 8:20 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.