चिखली ( बुलढाणा ) : ११ नोव्हेंबर २०२० रोजी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड यांनी सहाय्यक दुय्यम निबंधक यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. शेतकऱ्यांकडून दुय्यम निबंधक लाच घेतात, असा आरोप करत यावेळी त्यांच्या टेबलवरील फाईल्स ही फेकून दिल्या होत्या.
दोन वर्ष कारावास, दहा हजारांचा दंड : चिखली पोलिसांनी गायकवाड यांच्यावर गुन्हा दखल करत, या प्रकरणी न्यायालयात याबाबतीत प्रकरण ठेवले होते. न्यायालयाने मनसे जिल्हाध्यक्ष मदन गायकवाड यांना दोन वर्ष कारावास व दहा हजारांचा दंड सुनावला आहे. तर दुसरा आरोपी ज्ञानेश्वर भुसारी याची निर्दोष मुक्तता केली आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. चिखली येथे सहाय्यक दुय्यम निबंधक म्हणून महादेव सखाराम कळस्कर हे कार्यरत होते. चिखली येथील दुय्यम निबंध कार्यालयात महादेव कळसकर कार्यरत असताना 11 नोव्हेंबर 2022 रोजी मदन गायकवाड, सुरेश ज्ञानेश्वर भुसारी व अन्य काही व्यक्ती कार्यालयात आले होते. सोबतच कळस्कर यांना कथित स्तरावर बनावट प्रमाणपत्राच्या आधारे दस्तऐवज नोंदणी करण्याची मागणी करू लागले. त्यासाठी त्यांनी जबरदस्ती केली. तसेच अश्लील शिवीगाळ करत टेबलावरील फाईल त्यांच्या तोंडावर फेकून मारल्या. त्यांना चापट मारून जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
मोबाईलमध्ये चित्रीकरण : या घटनाक्रमाचे गायकवाड यांनी मोबाईल मध्येही चित्रीकरण केले होते. या प्रकरणी मारहान करणे, तथा शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तक्रारीवरून चिखली पोलिसांनी मदन गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. सुरेश न्यानेश्वर भुसारी यांच्या विरोधात विविध कलमान्वये पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चिखली पोलिसांनी या प्रकरणी तपास करून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खट्टी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एकूण सात साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या.
सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या : समाजवादी पक्षा तर्फे योग्य युक्तिवाद करून आवश्यक पुरावे सादर करण्यात आले होते. दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद ऐकून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष मदन गायकवाड यांना शासकीय कामात अडथळा आणण्याचा व अन्य कलमांवर दोषी धरून 2 वर्षे कारवासाची शिक्षा सुनावली. सोबत 10 हजार रुपयांचा दंड सुनावला. अन्य काही कलमान्वही त्यांना शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा त्यांना एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. या प्रकरणातील दुसरा आरोपी सुरेश ज्ञानेश्वर भुसारी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.