ETV Bharat / state

बुलडाण्यात डॉक्टरांना मारहाण; हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा मृताच्या नातेवाईकांचा आरोप - जिल्हा शल्यचिकित्सक बुलडाणा

गेल्या 9 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या 6 वर्षीय मुलाचा रेनबो बाल रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्याने मुलाच्या नातेवाईकांनी बालरोग तज्ञ डॉ.जयसिंग मेहेर यांना रुग्णालयात मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (29 ऑगस्ट)ला घडली.

6 वर्षीय मुलाचा रेनबो बाल रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्याने मुलाच्या नातेवाईकांनी बालरोग तज्ञ डॉ.जयसिंग मेहेर यांना रुग्णालयात मारहाण केल्याची घटना घडली आहे.
author img

By

Published : Aug 31, 2019, 10:44 AM IST

बुलडाणा - गेल्या 9 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या 6 वर्षीय मुलाचा रेनबो बाल रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्याने मुलाच्या नातेवाईकांनी बालरोग तज्ञ डॉ.जयसिंग मेहेर यांना रुग्णालयात मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (29 ऑगस्ट)ला घडली. या प्रकारात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांना केला आहे. मृत पावलेल्या मुलाचे नाव सोहम सुभाष डाबेराव असून, तो नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील राहवासी आहे.

संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी पोलिसांनी उपचाराची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात अद्याप तक्रार नोंदवली नसून, मृत्युचे कारण समोर येण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

हेही वाचा: बुलडाणा : श्रावण सोमवारनिमित्त जटाशंकर दर्शनाला गेलेला तरुण शिवणी तलावात बुडाला

याप्रकरणी रेनबो रुग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.

संबंधित घटनेमुळे रुग्णालयात भरती असलेल्य रुग्णांसह त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला.

काय आहे प्रकरण...

टाकरखेड येथील सुभाष डाबेराव यांनी आपल्या 6 वर्षाच्या मुलाला जांभरुळ रोड वरील बालरोगतज्ञ डॉ.जयसिंग मेहेर यांच्या खासगी रुग्णालयात 21 ऑगस्टला उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, 25 ऑगस्ट पर्यंत सोहमच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्याला डॉ. पंजाब हिरे यांच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, शुक्रवारी 29 ऑगस्टला औषधोपचारानंतर सोहमची प्रकृती सुधारली. परंतु, यानंतर रुग्णालय प्रशासनाने पुढील उपचार योग्यपद्धतीने न केल्याने रात्री 8 ते 9 च्या दरम्यान सोहमची प्रकृती खालावून त्याचा अचानक मृत्यू झाला.

हेही वाचा: बुलडाण्याच्या मासरुळमध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या

मृत्यूची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर रेनबो रुग्णालयात तणावाची परिस्थिती तयार झाली. यावेळी अधिक माहिती देण्यासाठी आलेल्या डॉ.जयसिंग मेहेर यांना सोहमच्या नातेवाईकांनी मारहाण केली.
शहरातील बालरोगतज्ञ डॉ.पंजाब हिरे, डॉ.राजेंद्र बेदमूथा, डॉ.संजय हिवाळे आणि डॉ.जयसिंग मेहेर यांनी रेनबो बाल रुग्णालय सुरू केले आहे.

Intro:Body:बुलडाणा:- गेल्या 9 दिवसापासून आजारावर उपचार घेत असलेल्या 6 वर्षीय मुलाचा रेनबो बाल रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्याने मुलाच्या नातेवाईकांनी बालरोग तज्ञ डॉक्टर जयसिंग मेहेर यांना रुग्णालयात चोप दिल्याची घटना शुक्रवारी 29 ऑगस्टच्या रात्री घडली.मुलाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामूळे मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे.यावेळी रुग्णालयात भरती असलेले रुग्णांना घेवून त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला.सदर मुलाचे नाव सोहंम सुभाष डाबेराव असून तो नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील राहवासीं आहे..प्रकरणाची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे आपल्या ताफ्यासह रेनबो रुग्णालयात दाखल होवून त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळविले प्रकरणी पुढील चौकशी करिता मुलावर झालेल्या उपचाराची कागदपत्रे ताब्यात घेतले आहे.बालकाचा शवविच्छेदन करण्यात आले असून आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.नातेवाईकांनी डॉक्टरांच्या विरोधात तक्रार नोंदविली नसून तरी सदर मुलाचा मृत्यू का झाला आणि कशामुळे झाला याची चौकशी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या समितीमार्फत करून जे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर मृत्यूस कारणीभूत म्हणून कायदेशीर कारवाई करणार असल्याचे संकेत पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिले आहे.तर याप्रकरणी रेनबो रुग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास डॉक्टरांनी बोलण्यास नकार दिला..

टाकरखेड येथील सुभाष डाबेराव यांनी आपल्या 6 वर्षीय सोहंम नामक मुलाला आजारी असल्याकारणाने जांभरुळ रोड वरील बालरोगतज्ञ डॉ.जयसिंग मेहेर यांच्या खाजगी रुग्णालयात 21 ऑगस्ट रोजी भरती केले होते.दरम्यान 25 ऑगस्ट पर्यन्त सोहंमच्या तब्बेतीत सुधारणा न झाल्याचे दिसल्याने डॉ.मेहेर यांच्याकडून सोहंमची छूट्टी घेवून डॉ. पंजाब हिरे यांच्याकडे सोहंमला दाखविले पुढील उपचाराकरिता डॉ.हिरे यांनी रेनबो रुग्णालयात भरती केले. शहरातील बालरोगतज्ञ डॉ.पंजाब हिरे,डॉ.राजेंद्र बेदमूथा,डॉ.संजय हिवाळे आणि डॉ.जयसिंग मेहेर यांनी रेनबो बाल रुग्णालयाची निर्मिती केली आहे.दरम्यान शुक्रवारी 29 ऑगस्ट रोजी सोहंमला औषधपचार केल्यानंतर संध्याकाळ पासून सोहंमची तब्बेतीत बदल होवून याबाबत रेनबो रुग्णालय प्रशासनाला माहिती देवून ही दखल घेण्यात न आल्याने डॉक्टरांच्या हलगर्जीपणामूळे रात्री 8 ते 9 वाजेच्या दरम्यान सोहंमचा अचानक मृत्यू झाला.मृत्यूची माहिती नातेवाईकांना मिळाल्यानंतर रेनबो रुग्णालयात तणाव निर्माण झाला आणि तेथे समजूत काढण्यासाठी आलेल्या डॉ.जयसिंग मेहेरला सोहंमच्या नातेवाईकांनी चांगलाच चोप दिला.यावेळी रुग्णालयात भरती असलेले रुग्णांना त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयातून काढता पाय घेतला.याची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळावर दाखल होवून परिस्थिती नियंत्रात आणली..

बाईट:-1) शिवाजी कांबळे,पोलीस निरीक्षक,बुलडाणा शहर पो.स्टे.

2) मूतक मुलाची आई..

-वसीम शेख,बुलडाणा-Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.