बुलडाणा - जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील उतावळी नदीच्या प्रकल्पावरील सांडव्याजवळ रविवारी 13 सप्टेंबरला कुठेही सोशल डिस्टनसिंग किंवा सरकारी नियमांच पालन न करता शेकडोंच्या संख्येत उतावळ्या नागरिकांनी गर्दी केली होती. तर काही उतावळ्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत आनंद लुटला. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे. उतावळी प्रकल्पावर आता फिरकणाऱ्या उतावळ्यांवर पोलीस कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. सोबतच मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी कोरोना काळात अशी गर्दी करणे चुकीचे म्हणत नागरिकांना अशी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.
उतावळी प्रकल्पावर फिरकणाऱ्या उतावळ्यांवर आता होणार पोलीस कारवाई - बुलडाणा पोलीस कारवाई बातमी
सोशल डिस्टनसिंग किंवा शासनाच्या नियमांचे पालन करण्यात आले नाही. तर अनेकांनी याठिकाणी डीजेच्या तालावर ठेका धरत गर्दी केली होती. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाच्या महसूल, पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्याठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात केले आहे. ज्यांनी डीजे वाजविला व ज्यांनी तिथे स्टॉल लावले त्यांच्यावर साथरोग अधिनियम व लोकसेवकांनी जारी केलेल्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येणार असल्याचे मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप तडवी यांनी म्हटले.