बुलढाणा भविष्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून भाजपचा उमेदवार उभा राहिल्यास त्यासाठी संघटन मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना गटाचा उमेदवार बुलढाणा BJP Shinde Shivsena candidate from Buldana येथून उभाही राहू शकतो. परंतु, तत्पूर्वी आम्ही आमचं भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे BJP State President Chandrasekhar Bawankule यांनी बुलढाणा दौऱ्यादरम्यान दिली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे बुलढाणा जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. भारतीय जनता पक्ष बुलढाण्यावर लोकसभेसाठी दावा करेल BJP claim for Lok Sabha seat in Buldhana का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला असल्यामुळे खासदार प्रतापराव जाधव यांच्या भविष्यातील उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
भाजप, शिंदे गट उत्तम काम करणार भारतीय जनता पार्टी आणि शिंदे शिवसेना ही राज्यात दोन वर्ष उत्तम प्रकारे काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात 45 प्लस लोकसभेच्या जागा निवडण्याचा निर्धार आहे. तर भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आणि शिंदे शिवसेनासोबत दोनशे प्लस विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा आमचा मानस आहे. त्या दृष्टिकोनातून आम्ही राज्यभर आढावा घेत आहोत. केंद्रीय भारतीय जनता पक्षाने देशातील 144 लोकसभा मतदारसंघ केंद्रित केले आहेत. त्यामध्ये राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघ आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघांमध्ये वरिष्ठ केंद्रीय मंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते भूपेंद्र यादव हे सहा वेळा येणार आहेत. ते पक्षाचं संघटन मजबूत करणार आहेत. प्रत्येक वेळी ते तीन दिवस येथे राहणार आहेत. जनता दरबार घेणार आहेत. केंद्रातील गोरगरिबांच्या योजना बुलढाणा जिल्ह्यातील गोरगरिबांपर्यंत पोहोचल्या किंवा नाही याचा आढावा ते घेणार आहेत. केंद्र सरकार, राज्यातील भाजप आणि शिंदे शिवसेना सरकार व यांचे अधिकारी हे या मतदारसंघातील मतदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील भाजप ही मजबूत करण्यासाठी आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वामध्ये काम सुरू झालेले आहे भारतीय जनता पक्षाला मजबूत करण्याचा हाच एक उद्देश आहे असेही भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले.
भाजप, शिंदे गट एकत्रित निवडणुका लढणार भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदे शिवसेना ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्र लढणार आहे. त्या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये उमेदवार निश्चित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. उदाहरणार्थ या मतदारसंघातून भविष्यात एकनाथ शिंदे हे खासदारकीसाठी उभे राहू शकतात. त्या हिशोबाने भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचे संघटन करून शिंदेंची जी मूळ शिवसेना आहे, तिला मजबूत करण्याचं काम करण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे शिवसेना ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचेही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुलढाणा येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
खासदार जाधव यांच्या उमेदवारीवरच टांगती तलवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या खासदारकीच्या उमेदवारीवरून बुलढाणा जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटात सहभागी झालेले आहेत. ते शिंदे गटात सहभागी असताना भविष्यातील भाजप शिंदे गट निवडणूक एकत्र लढणार असल्याचे बोलल्या जात असताना लोकसभेमध्ये खासदार प्रतापराव जाधव हेच उमेदवार राहू शकतात की नाही या संदर्भामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी संकेत दिले आहे. त्यामुळे भविष्यातील खासदारकीचे उमेदवार हे भाजपचे किंवा शिंदे गटाचे राहतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. परिणामी, खासदार प्रतापराव जाधव यांच्या उमेदवारीचा विषय हा भाजपच्या गटातून मंजूर होण्याची शक्यता आहे.