ETV Bharat / state

शासकीय नोटीसद्वारे बातमी प्रकाशित केल्याने संपादकावर कारवाई, पत्रकारांकडून निषेध

author img

By

Published : Feb 3, 2021, 9:14 PM IST

पत्रकारावर कारवाई केल्याने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये पोलिसांप्रती रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेचा जिल्हा पत्रकार संघटना, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन, विदर्भ पत्रकार संघटना आदि पत्रकार संघटनानी जाहिर निषेध व्यक्त केला आहे.

buldana-district-journalist
buldana-district-journalist

बुलडाणा - जिल्ह्यातील नांदुरा येथील एका वृत्तपत्रात नगरविकास मंत्रालयाने नांदुरा नगराध्यक्षाबाबत पाठविलेल्या नोटीसाद्वारे बातमी प्रकाशित केल्याने वृत्तपत्र संपादक शैलेंद्र वाकोडे यांच्याविरुद्ध नगराध्यक्षा राजनीताई जावरे यांचे पती अनिल पंढरी यांनी पोलिसात बदनामी केल्याची तक्रार 26 जानेवारीला दिली. त्याआधारे पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता संपादकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारची पत्रकारावर कारवाई केल्याने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये पोलिसांप्रती रोष व्यक्त केला जात आहे. या घटनेचा जिल्हा पत्रकार संघटना, टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन, विदर्भ पत्रकार संघटना आदि पत्रकार संघटनानी जाहिर निषेध व्यक्त केला आहे.

जिल्ह्याधिकारी एस. रामामूर्ती व जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांना सर्व पत्रकारांच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संपादकावर केलेल्या कारवाईची चौकशी करुन नांदुरा ठाणेदारावर कारवाईची मागणी करण्यात आली.

नांदुरा ठाणेदार यांची तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी -

नगरविकास मंत्रलयाने पाठविलेली नोटीस प्रकाशित करणे हा गुन्हा नसून तो पत्रकारांचा अधिकार असल्याचे यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना सांगितले तसेच पोलिस कारवाई करणे म्हणजे पत्रकारांची मुस्कटदाबी करणे होय. नुकताच पत्रकार संरक्षण कायदा अमलात आला असून पत्रकारांच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे गरजेचे आहे. मात्र
तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यातील पत्रकारांनी नांदुरा ठाणेदार यांची तात्काळ उचलबांगडी करुन कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यावेळी निवेदन सादर करतांना जिल्हा पत्रकार संघाचे चंद्रकांत बर्दे, अजय बिलारी, सिध्दार्थ आराख, रंजितसिंह राजपूत, वसिम शेख, संजय जाधव, युवराज वाघ, प्रेमकुमार राठोड, भानुदास लकडे, कासिम शेख, संदीप वंत्रोले, दिपक मोरे, संदीप शुक्ला, नितीन कानडजे पाटील, आदेश कांडेलकर, निलेश राऊत, यशवंत पिंगळे, शैलेश वाकोडे, प्रविण डवंगे, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम भातुरकर, वैभव काजळे, भाऊसाहेब बावने, विनोद गावंडे, राजेश काजळे, तुकाराम रोकडे, किशोर खैरे, सुहास वाघमारे, विवेक पाऊलझगडे, महेश पांडे, संतोष तायडे उपस्थित होते.

पत्रकारांविरुद्ध आलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी देणार पत्र -

नगरविकास मंत्रालयाने नांदुरा नगराध्यक्षाबाबत पाठविलेल्या नोटीसाद्वारे बातमी प्रकाशित केल्याने वृत्तपत्र संपादकांच्या विरुद्ध नगराध्यक्ष पतीने पोलिसात बदनामी केल्याची तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी कुठलीही शहानिशा न करता संपादकावर अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याबाबत ठाणेदारावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर पत्रकरांची तक्रार आल्यास त्याची प्रथम चौकशी करून पुढील निर्णय घ्यावा, असे पत्रव्यवहार मी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना देणार असल्याची ग्वाही जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.