ETV Bharat / state

शासनाकडून बुलडाणा जिल्ह्याला मिळाल्या 17 नवीन वातानुकूलित रुग्णवाहिका

शासनाकडून बुलडाणा जिल्ह्याला 17 नवीन वातानुकूलित रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. या रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणार आहेत.

Buldana district gets 17 new air-conditioned ambulances from the government
शासनाकडून बुलडाणा जिल्ह्याला मिळाल्या 17 नवीन वातानुकूलित रुग्णवाहीका
author img

By

Published : Jun 2, 2021, 9:13 PM IST

बुलडाणा - मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाषणात राज्याला नवीन रुग्णवाहिका देणार असल्याची सांगितले होते. सांगितल्याप्रमाणे बुलडाणा जिल्ह्याकरता शासनाकडून 17 नवीन वातानुकूलित रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. 31 मेरोजी या 17 रुग्णवाहिका बुलडाण्यात दाखल झाल्या. या रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी वापरल्या जाणार आहेत.

शासनाकडून बुलडाणा जिल्ह्याला मिळाल्या 17 नवीन वातानुकूलित रुग्णवाहिका

एका रुग्णवाहिकेची अंदाजी किंमत आहे 15 लाख 70 हजार रुपये -

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अर्थसंकल्पीय भाषणात नव्या रुग्णवाहिका देण्याचे आश्वासीत केले होते. दरम्यान, राज्यासह बुलडाणा जिल्ह्याला देखील कोरोना रुग्णांसाठी नवीन वातानुकूलित रुग्णवाहिका देण्यात आल्या आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यासाठी 17 नवीन रुग्णवाहिका 31 मे रोजी जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या नवीन रुग्णवाहिकांवर जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. जिल्ह्यातील आवश्यक असलेल्या रुग्णालयांना या रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. वातानुकूलित असलेल्या एका रुग्णवाहिकेची किंमत जवळपास 15 लाख 70 हजार रुपये सांगितल्या जात आहे.

अशा प्रमाणे जिल्ह्यात देण्यात येणार रुग्णवाहिका -

जिल्हा सामान्य रुग्णालयाल2
बुलडाणा स्त्री रुग्णालय2
खामगाव सामान्य रुग्णालयाला 1
शेगाव सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय1
मेहकर ग्रामीण रुग्णालय 1
लोणार ग्रामीण रुग्णालय1
मोताळा ग्रामीण रुग्णालय1
तालखेड प्राथमिक आरोग्य केंद्र1
नांदुरा 1
जामोद1
संग्रामपूर1
अटाळी 1
सुलतानपूर 1
रायगाव 1
जऊलखेड प्राथमिक आरोग्य केंद्र1

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.