ETV Bharat / state

शिक्षक मतदानाची बुलडाणा जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी - buldana breaking news

विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची बुलडाणा जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्ह्यातून 7 हजार 484 जण यासाठी मतदान करणार आहेत.

संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Nov 18, 2020, 9:00 PM IST

बुलडाणा -विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची बुलडाणा जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी चालवली आहे. जिल्ह्यातील 7 हजार 484 मतदारांच्या हातावर लावण्यात येणाऱ्या मतदान शाई संदर्भात निवडणूक आयोगाचे निर्देश प्राप्त झाले आहेत.

जिल्ह्यातील 7 हजार 484 मतदारांची अंतिम यादी प्रकाशित करण्यात आली आहे. या याद्या विभागीय आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 14 मतदान केंद्रासाठी मतदान केंद्राध्यक्ष व 2 मतदान अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांचे पाहिले प्रशिक्षण 18 व 30 नोव्हेंबरला पार पडणार आहे तर 26 तारखेला मतदान साहित्याचे वाटप करण्यात येईल. ते जिल्हाधिकारी कार्यालयातील समृद्धी महामार्ग विभागात उभारण्यात येणाऱ्या सुरक्षा कक्षात ठेवण्यात येईल. मतपत्रिका स्थानिक ट्रेझरी कार्यालयात कडक बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे. या सर्व तयारीवर जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, उप जिल्हा निवडणूक अधिकारी भिकाजी घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते हे लक्ष ठेवून आहे. निवडणूक रिंगणातील मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांना ही यादी मोफत देण्यात येणार आहे तर इतर उमेदवारांना मात्र ही यादी विकत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने मतदान शाई संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

अमरावतीत होणार मतमोजणी-

3 डिसेंबरला अमरावती येथे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीच्या मतमोजणीची पूर्वतयारी करण्यात येत आहे, यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील केवळ 5 अधिकारीच उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी एस, रामामूर्ती, उप-जिल्हा निवडणूक अधिकारी भिकाजी घुगे, खामगावचे एसडीओ राजेंद्रसिंह जाधव, सिंदखेडराजाचे एसडीओ सुभाष दळवी व लोणार तहसीलदार सैफन नदाफ यांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.